ठाणे : धक्कादायक! प्रियकरासाठी वाट्टेल ते...मुलीकडून आईची हत्या

प्रियकराशी बोलण्यास विरोध केल्याने हत्या, तिघांना केली अटक
क्राईम न्यूज
क्राईमFile Photo
Published on
Updated on

पनवेलः पनवेल शहरातील मध्यवर्ती भागातील माणिक नगर सोसासयटीमध्ये राहाणार्‍या प्रिया नाईक (44) यांचा शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी झालेल्या खून प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरण्यास आईकडून निर्बंध घातल्याच्या रागातून मृत प्रिया नाईक यांची विवाहीत मुली प्रणाली प्रल्हाद नाईक(25) हीनेच विवेक पाटील व विशाल पांडे या दोघांना आई प्रिया नाईक यांच्या खूनाकरिता 10 लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे.

Summary

एखाद्या सिनेमा वा मालिकेतील कथानकातील अशी खुनाची घटना पनवेलमधील मध्यवर्ती भागातील माणिक नगर सोसायटीत घडल्याने एकच खळबळ माजली. याप्रकरणी मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक, विवेक पाटील व विशाल पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक हिने पोलीसांना दिलेल्या जबानीतून हे धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पनवेल पोलिसांनी मृत प्रिया नाईक यांची विवाहीत मुली प्रणाली प्रल्हाद नाईक आणि 10 लाखाची सूपारी घेऊन खून करणारे विवेक पाटील व विशाल पांडे अशा तिघांनाही अटक करुन पनवेल न्यायालयालया समोर हजर केले असता त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.

मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे.पतीसोबत न पटल्याने ती गेल्या दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली. या दरम्यान आई प्रिया यांनी प्रणालीवर बाहेर ये-जा करण्यास तसेच फोनवर बोलण्यास बंधने घातली होती.ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे तसेच तिच्या मोबाईलची तपासणी करीत होती. आईच्या या निर्बंधांना ती वैतागली होती. दरम्यान,या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणालीला बहीण मानत होता. विवेकला पैशांची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. प्रणालीलाही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. मात्र त्याबदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले. पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली. त्याने आपला मित्र विशाल पांडे याच्या मदतीने 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया नाईक या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली.

याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात प्रिया नाईक यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते,पोलीस उपायुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे, पो. नि. प्रवीण भगत यांच्यासह सपोनि प्रकाश पवार, सुनील वाघ, राजेंद्र घेवडेकर,सुषमा पाटील, स्वप्नील केदार, पोउपनिरीक्षक विनोद लभडे, पो.हवा.परेश म्हात्रे, वाघमारे, वायकर, भोसले, डोईफोडे, शेवाळे,पाटील, सोनवणे, पो. ना. महेश पाटील आदींच्या विशेष पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध सुरू केला.

अधिक तपासात विवेक आणि विशाल यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांची चौकशी केली असता, प्रणालीने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे त्यांनी कबूल केले.त्यानंतर पोलिसांनी प्रणालीला देखील अटक केली. या आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पूढील तपासात या गुन्ह्यात अधिक माहिती समोर येणार असल्याचे सहा.पो.आयुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगीतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news