

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या इंटरनॅशनल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. यावेळी, पोलिसांनी एका 28 वर्षीय परदेशी दलाल महिलेला अटक करत तिच्या रखवालीतून दोन परदेशी महिलांची सुटका केली आहे.
तसेच त्या परदेशी दलाल महिलेला ठाणे न्यायालयाने येत्या 1 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे. सदर दलाल परदेशी महिला जुलै 2025 पासून त्या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घोडबंदर रोडवरील आनंद नगर परिसरात एक परदेशी दलाल महिला दोन परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवत वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कासारवडवली पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे त्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी मोबाईलसह एकूण सहा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आहे.
तसेच थायलँड या देशातील 28 वर्षीय दलाल महिलेला पकडून तिच्या रखवालीतून थायलँड निवासी असलेल्या दोन पीडित महिलांची सुटका केली. ही कारवाई गुरुवारी करून त्याच रात्री कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्या दलाल महिलेला अटक करण्यात आली.तर त्या दलाल महिलेला शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्या परदेशी महिलेला येत्या 1 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.