Thane Rickshaw Strike: रिक्षा-टॅक्सीचा संप महिनाभरासाठी टळला! ११ पैकी आठ मागण्या मान्य

उर्वरित तीन मागण्यांवर नागपूर अधिवेशनात तोडगा काढण्‍याचे परिवहनमंत्र्यांचे आश्वासन
Thane Rickshaw Strike
Thane Rickshaw StrikePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी संयुक्त कृती समितीने १ डिसेंबरपासून पुकारलेला बेमुदत संप तूर्तास महिनाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुरुवारी झालेल्या रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रिक्षाचालकांच्या ११ मागण्यांपैकी आठ मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. तर उर्वरित तीन महत्त्वाच्या मागण्यांवर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन

तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे १ डिसेंबरपासून होणारा रिक्षा संप तूर्तास टळला आहे.रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी संयुक्त कृती समितीने १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ठाणे शहरातील रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Thane Rickshaw Strike
Tata Power project: टाटा पॉवरच्या ब्लास्टिंगविरोधात ग्रामस्थ आक्रमक; उपोषणाचा इशारा

या संपामुळे ठाण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली.

या बैठकीला विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी, कृती समितीचे सल्लागार जितेंद्रकुमार इंदिसे, एकनाथ भोईर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले, रिक्षाचालकांच्या बहुतांश मागण्या या वस्तुस्थितीवर आधारित आहेत.

रिक्षाचालकांच्या दिवसभराच्या कमाईवर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या समस्यांकडे शासन सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. ११ मागण्यांपैकी आठ मागण्यांवर परिवहन विभागाच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

मात्र, मीटर दरवाढीसह तीन मागण्यांबाबत केंद्र शासनाच्या परिवहन विभागाचे अधिकार आणि काही कायदेशीर अडचणी असल्याने त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. यासाठी नितीन गडकरी यांना पत्र पाठवून बैठकीसाठी वेळ मागण्यात येणार असून, नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ही बैठक घेण्याचे नियोजन असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Thane Rickshaw Strike
Khalapur Fake Doctor: खालापूरमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; पदवी नसताना रुग्णांवर करत होता उपचार

या बैठकीत उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, बैठकीनंतर कृती समितीचे सल्लागार जितेंद्रकुमार इंदिसे यांनी संप स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. परिवहन मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन आठ मागण्या मान्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, मीटर दरवाढीसह उर्वरित तीन मागण्या रिक्षाचालकांसाठी महत्त्वाच्या आहेत.

या मागण्यांबाबत नागपूर अधिवेशनात केंद्रीय परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाला मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे. या कालावधीत मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही, तर एक महिन्यानंतर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही इंदिसे यांनी दिला.

सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे परमिट रद्द होणार

ठाण्यातील रिक्षा संघटनांच्या कृती समितीने १ डिसेंबर रोजी पुकारलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बैठक घेऊन रिक्षाचालकांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला.

या यशस्वी शिष्टाई मुळे १ डिसेंबरचा लाक्षणिक बंद तुर्तास मागे घेतल्याची घोषणा कृती समितीचे सल्लागार जितेंद्रकुमार इंदिसे यांनी जाहीर केले. दुसरीकडे शासकीय व निमशासकीय सेवेत असताना ज्यांनी रिक्षाचे परमिट घेतले आहे, ते रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

दरम्यान मंगळवारी सकाळी साडेदहा वा. मंत्रालयात स्वतंत्र बैठक बोलावली असून बैठकीस आरटीओ अधिकारी, प्रधान सचिव, मुख्यमंत्री खासगी सचिवांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.