Khalapur Fake Doctor: खालापूरमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; पदवी नसताना रुग्णांवर करत होता उपचार

वैद्यकीय पदवी आणि नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप; औषधसाठा आणि वैद्यकीय कचरा जप्त
Fake Doctors
Fake Doctorspudhari photo
Published on: 
Updated on: 

खोपोली: वावोशी छत्तीशी विभागातील गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरचा आरोग्य विभागाने सापळा रचून पर्दाफाश केला आहे. बोगस डॉक्टरविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय विभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे खालापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वावोशी बाजारपेठेतील समर्थ हॉस्पीटलमध्ये बोगस डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र नसताना अनुभवाच्या जोरावर रूग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले यांना मिळाली होती.

Fake Doctors
Vasai Family Dispute: कौटुंबिक वादातून बहिणीकडून भावाची अमानूष हत्या

त्यानुसार जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले स्टाफच्या मदतीने समर्थ हॉस्पीटल वावोशी येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता बोगस डॉक्टरअब्दुल रहिम मोहम्मद मुसा शेख (वय 56, सध्या रा. वावोशी, ता. खालापूर; मूळ रा. धारावी, मुंबई) यांना सापळा रचून पकडले.

यावेळी सदर डॉक्टरची चौकशी केली असता वैध पदवी नसल्याचे निष्पन्न झाल्यावर डॉक्टरवर पकडण्यात आले असून रूग्णालयातील औषधसाठा आणि वैद्यकीय कचरा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले यांनी खालापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fake Doctors
Juinagar Gold Robbery: नवी मुंबईत फिल्मी स्टाईल दरोडा; २० कोटींचे १६ किलो सोने पळवले

वैद्यकीय पदवी आणि नोंदणी नसताना केवळ अनुभवाच्या जोरावर रुग्णांवर उपचार करणे म्हणजे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याने संबंधित बोगस डॉक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.