Thane data center protest : वेक अप ठाणेकरचा शनिवारी डेटा सेंटरविरोधात एल्गार

ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार; हजारो ठाणेकर सहभागी होणार
Thane data center protest
Thane data center protestAI Image
Published on
Updated on

ठाणे : जनमत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटरविरोधातील ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेक अप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी बाळकूम येथील प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती वेक अप ठाणेकर या संस्थेच्या वतीने देण्यात आली.

बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे.

Thane data center protest
Data Centre Scam: टीडीआर घोटाळ्यानंतर आता डेटा सेंटर घोटाळा

या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. युरोप अमेरिकेतून हद्दपार केलेला हा प्रकल्प ठाण्यात आणण्यामागे नक्की कारण काय आहे, असा सवाल करून या प्रकल्पाविरोधात 18 जुलै रोजी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय ठाणेकरांनी घेतला आहे, असे वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, हिमानी वर्मा, जतीन कोठारे, गुरासिस बुमरा, लावण्या पाटील यांनी सांगितले.

सकाळी 10.00 वाजता कल्पतरू, बाळकूम येथील डेटा सेंटरबाहेर परिसरातील नागरिक निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात किमान 1 हजार नागरिक सहभागी होतील, असे वेक अप ठाणेकरच्या वतीने सांगण्यात आले.

Thane data center protest
Ashok Kharat Dubai Connection | भोंदू खरातचे 'दुबई' कनेक्शन उघड! 1500 कोटींचे आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेट; आता 'ईडी'चा दणका बसणार

डेटा सेंटरचा विषय राज्य शासनाकडे वर्ग होणार

वेक अप ठाणेकर, स्थानिक रहिवाशी, अमेझाॅन डेटा सेंटरचे प्रतिनिधी आणि ठामपा आयुक्त सौरव राव यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ठाणेकर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अमेझाॅन डेटा सेंटरचे अधिकारी देऊ शकले नाहीत. अखेरीस आयुक्त सौरव राव यांनी याबाबत आपण राज्य शासनाला अहवाल सादर करणार असून लवकरच मंत्रालयात बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान डेटा सेंटर विरोधात शनिवारी आंदोलन केले जाणार आहे.

मंत्रालयात बैठक घेण्याचे सुतोवाच

बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे, आदी मुद्दयांवर अमेझाॅनचे प्रतिनिधी आणि वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे यांच्यात चर्चा झाली. मात्र, त्यातून कोणताच मार्ग न निघाल्याने मंत्रालयात बैठक घेण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news