Ashok Kharat Dubai Connection | भोंदू खरातचे 'दुबई' कनेक्शन उघड! 1500 कोटींचे आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेट; आता 'ईडी'चा दणका बसणार

Ashok Kharat Dubai Connection | दुबईपर्यंत धागेदोरे; बडे भक्त अन् अधिकाऱ्यांचे कवच
 ED raids
ईडीचे उत्तर गोव्यात 12 ठिकाणी छापासत्रPudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वयंघोषित नाशिकमधील कॅप्टन आणि भोंदू अशोक खरात याच्या गुन्हेगारी कारवायांची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. हवाला मागनि दुबईपर्यंत पैशांची देवाण-घेवाण केल्याची गंभीर बाब विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत समोर आली आहे. खरातचे आर्थिक व्यवहार व मालमत्ता १,५०० कोटींच्यावर आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी चौकशी करण्याची शक्यता आहे.

 ED raids
Ashok Kharat Land Scam | "जमीन विकली नाही तर भावांचा मृत्यू होईल!" भोंदू खरातने मृत्यूची भीती दाखवून हडपली माळी बंधूंची जमीन

महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवून फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार अशा विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अशोक खरातचा आणखी एक मोठा कारनामा उघडकीस आला आहे. खरात प्रकरण हे फक्त महिलांचे लैंगिक शोषण या पुरते मर्यादित नसून आता काळा पैसा थेट परदेशात पाठवायचा या माध्यमातून आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेट चालविण्याचा सुद्धा खरातचा धंदा होता, असे तपासात निष्पन्न झाले आहेत.

एसआयटीच्या तपासात खरात हा मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली असून, परदेशात बेकायदेशीरपणे पैसा पाठवण्यासाठी त्याने या माध्यमाचा वापर केल्याचे स्पष्ट होत आहे. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातून दुबईपर्यंत आणि तेथून पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाण-घेवाण करण्यात येत होती. या व्यवहारांसाठी खरातने खासगी एजंट्स, बेकायदेशीर मार्ग आणि बनावट आर्थिक व्यवहारांचा आधार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यवहारांचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

या संपूर्ण रॅकेटमध्ये काही बडे राजकीय नेते, प्रभावशाली भक्त आणि काही भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाल्याचा संशय आहे. या पाठबळामु‌ळेच खरातचे बेकायदेशीर व्यवहार दीर्घकाळ निर्भयपणे सुरू होते.

खरातविरोधात तक्रारींचा ओघही वाढत असून, एसआयटी च्या हेल्पलाइनवर आतापर्यंत १०० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सुमारे ७० टक्के तक्रारदार महिला असल्याचे समोर आले आहे. मात्र, सामाजिक बदनामीची भीती आणि आरोपीची दहशत यामुळे अनेक महिला लेखी तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशोक खरात विरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत.

 ED raids
Goa Cyber Police | म्हापशातील बंगल्यात 'इंटरनॅशनल' ठगबाजी! अमेरिकन नागरिकांना लुटणारे ७ सायबर गुन्हेगार गजाआड

यात फसवणूक आणि लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. 'मी महादेवाचा अवतार आहे' असे सांगून महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याचे आरोपही पुढे आले आहेत. या सर्व प्रकरणामुळे खरातचे गुन्हे केवळ स्थानिक मयदित राहिले नसून, ते आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.

'ईडी' कडूनही होणार चौकशी

तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले असून, त्यात डायऱ्या, डिजिटल डेटा, मोबाइलमधील माहिती आणि बँक व्यवहारांचे तपशील समाविष्ट आहेत. या पुराव्यांवरून परकीय चलन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलंघन झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील चौकशीत सहभागी होण्याची शक्यता आहे. हा तपास एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी किरण सूर्यवंशी यांचे पथक करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news