Thane public WiFi service : ठाण्यातील शाळा, रुग्णालये, रेल्वेस्थानक, मेट्रोच्या स्थानकांमध्ये वायफायची सुविधा

आठ तास मिळणार वायफायची मोफत सुविधा, त्यानंतर भरावे लागणार शुल्क
Thane public WiFi service
ठाण्यातील शाळा, रुग्णालये, रेल्वेस्थानक, मेट्रोच्या स्थानकांमध्ये वायफायची सुविधाpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानक, मेट्रोची स्थानके तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी ही वायफायची सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरुवातीचे आठ तास ही सुविधा मोफत मिळणार असली तरी त्यानंतर मात्र ही सेवा घ्यायची असेल, तर शुल्क मोजावे लागणार आहे. यापूर्वी देखील शहरात वायफाय सुविधा देण्याची योजना आखली होती, मात्र ही सुविधा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

ठाणे शहराला मोफत वायफाय सुविधा देण्याची ठाणे महापालिकेकडून यापूर्वी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मोफत वायफाय सेवा देणाऱ्या संबंधित कंपनीने परस्पर कनेक्शन विकून लाखो रुपये कमवत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या नगरसेवकांनी त्यावेळी सर्वसाधारण सभेत केला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही नगरसेवकांनी त्यावेळी केली होती.

Thane public WiFi service
Car catches fire Thane : घोडबंदर रोड पातलीपाडा ब्रिजवर ‌‘दी बर्निंग कार‌’चा थरार

आता पुन्हा एकदा शहरात मोफत वायफाय देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी शासनाचा निधी देण्याची तयारी देखील दर्शवली आहे.

कंपनीशी लवकरच करार...

संबंधित कंपनीशी यांदर्भात लवकरच करार करण्यात येणार आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानक, मेट्रोची स्थानके तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी ही वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरुवातीचे आठ तास ही सुविधा मोफत मिळणार असली तरी त्यानंतर मात्र या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर ठाणेकरांना यासाठी शुल्क मोजावे लागणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Thane public WiFi service
Highway to civic body transition : घोडबंदर रोडनंतर आता राष्ट्रीय महामार्ग पालिकेकडे हस्तांतर होणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news