Aadharwad mobile app : पोलिसांच्या भेटीगाठीत 'आधारवड': ज्येष्ठांसाठी सुरक्षा, विश्वासाचा हात !

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाईल अ‍ॅप
Aadharwad mobile app
पोलिसांच्या भेटीगाठीत 'आधारवड': ज्येष्ठांसाठी सुरक्षा, विश्वासाचा हात !pudhari photo
Published on
Updated on

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या “आधारवड” मोबाईल ऍपला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. कोपरी पोलिस ठाण्याच्या पुढाकारातून परिसरातील ज्येष्ठांना या अ‍ॅपची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन करत आहेत. या मोहिमेमुळे ज्येष्ठांच्या मनात विश्वास, सुरक्षिततेची जाणीव आणि पोलिस प्रशासनाशी जोडलेपण अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसले.

कोपरी पोलिस परिसरातील ज्येष्ठांना प्रत्यक्ष भेटीगाठी करून अ‍ॅपचे महत्त्व पटवून देत मोबाईलवर हे ऍप डाउनलोड करून देण्यात येत आहेत, तसेच त्याचा वापर कसा करावा हेही दाखवून दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अ‍ॅप एकप्रकारे जीवनरक्षक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी व्यक्त केली.

ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतील आधारवड मोबाईल अ‍ॅप जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोपरी पोलिस ठाण्याच्या या मोहिमेत पोलिस अधिकारी व कर्मचारी स्वतः ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत होते. अनेक ज्येष्ठांनी आपल्या मनातील भीती व समस्या व्यक्त केल्या.

Aadharwad mobile app
Thane News : अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांची दिवाळी यावर्षी गोड होणार

पोलिसांनी त्या मनापासून ऐकून घेतल्या आणि तत्काळ मार्गदर्शन केले. त्यामुळे ‘आधारवड’ हा शब्द केवळ मोबाईल अ‍ॅपपुरता मर्यादित न राहता खर्‍या अर्थाने पोलिसांचा आधारवड ठरतो आहे, अशी भावना नागरिकांमध्ये उमटली. या वेळी पोलिस उपनिरीक्षक नितीन राऊत, सिताराम गावित, पोलिस हवालदार जितेंद्र खलाटे, दीपक पाटील, करण जवाने आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

‘आधारवड’अ‍ॅपची वैशिष्ट्ये

  • एका क्लिकवर थेट पोलिसांशी संपर्क साधण्याची सुविधा.

  • आपत्कालीन परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना झटपट मदत मिळण्याची खात्री.

  • कुटुंबीयांचे व नातेवाईकांचे तातडीचे संपर्क क्रमांक ऍपमध्ये सेव्ह करण्याची सोय.

  • ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसोबत मानसिक आधार व आत्मविश्वास वृद्धिंगत होणे.

Aadharwad mobile app
Malanggad landslide risk : श्री मलंगगडावर दरडी कोसळण्याचा धोका

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षिततेचा हात पुढे ‘आधारवड’ मोबाईल ऍप ठाणे पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण मानला जात आहे. भविष्यात या उपक्रमाचा अधिक व्यापक फायदा सर्व ज्येष्ठांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निशिकांत विश्वकार (वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोपरी पोलिस ठाणे)

‘आधारवड’ मोबाईल ऍप माध्यमातून पोलिसांनी केवळ सुरक्षेची हमी दिली नाही, तर ‘तुम्ही एकटे नाही, पोलिस कायम तुमच्या पाठीशी आहेत’ असा आश्वासक संदेशही दिला. त्यामुळे एक समाधान, दिलासा आणि विश्वास वाटला.

वामन कर्वे, ज्येष्ठ नागरिक, ठाणे पूर्व

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news