Thane News : अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांची दिवाळी यावर्षी गोड होणार

अनुदानास पात्र शाळांना तात्काळ अनुदान वितरित करावे-आ.म्हात्रे
Pending grant for teachers
अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांची दिवाळी यावर्षी गोड होणारpudhari photo
Published on
Updated on

वागळे : जिल्ह्यातील टप्पा वाढ व नव्याने 20 टक्क्यास पात्र झालेल्या शाळांना अनुदान वितरित करण्याकरीता होत असलेल्या विलंबाबाबत विचारणा करून टप्पा वाढ आदेश शाळांना त्वरीत द्यावे याकरिता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, वेतन पथक अधिक्षीका रुपाली खोमने यांची जिल्हा परिषद, ठाणे येथे दि.25 सप्टेंबर रोजी भेट घेतली.

टप्पावाढ अनुदान आदेश देण्यासंदर्भात चर्चा करून शासकीय आदेशाची अंमलबजावणी करा व टप्पा वाढ, अनुदान पात्र शाळांना तात्काळ अनुदान वितरित करावे, असे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.

Pending grant for teachers
Navratri 2025 : मुस्लिम दाम्पत्य 45 वर्षांपासून साजरा करतेय नवरात्रोत्सव

यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या विविध समस्या मार्गी लावल्या. प्रलंबित असलेल्या टप्पा वाढ आदेश, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व वैयक्तिक मान्यता त्वरीत देण्यात आल्या. तसेच सध्या जिल्हा परिषद शिक्षण विभागात ई-ऑफिस प्रणाली सुरु झाल्यामुळे शिक्षण विभागात अपूरी संगणक प्रणाली असल्यामुळे शिक्षकांचे विविध कामे प्रलंबित होत होते. त्यातच अनुदानाचे प्रतिक्षेत असल्या शिक्षक कर्मचार्‍यांना अनुदान टप्पा वाढ मंजुर झाल्याने शिक्षकांचे अनुदान कामात संगणकामुळे दिरंगाई होऊ नये व टप्पा वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे, यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्वखर्चातून शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक, वेतन पथक यांना संगणकाचे एकूण दहा संच आणि मल्टिपर्पज प्रिंटर संच भेट देण्यात आले. यामुळे टप्पा वाढ अनुदानाचे प्रतिक्षेतील शिक्षकांची दिवाळी यावर्षी गोड होणार आहे.

Pending grant for teachers
Malanggad landslide risk : श्री मलंगगडावर दरडी कोसळण्याचा धोका

यावेळी शिव छत्रपती शिक्षक संघटनेचे प्रांत अध्यक्ष प्रशांत भांबरे, ठाणे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष धनाजी दळवी,उपाध्यक्ष प्रकाश मगर मुख्याध्यापक संघाचे गणेश पाटील, प्रवीण लोंढे, जिल्हा सचिव मनोहर पाटकर, सतीश ठाणगे, प्रदीप पाटील, जीवन जाधव, अशुतोष सिंग, जे.पी. सोनवणे, अनिल पाटील, प्रसिद्धीप्रमुख अर्जुन चेमटे आणि अनेक कार्यकर्ते शिक्षक हजर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news