

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : वाशी येथून कल्याणला प्रवासी घेऊन निघालेल्या 'एनएमएमटी' बसला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ झाला. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
वाशी ते कल्याण मार्गावरील बसेस सकाळी गर्दीने भरलेल्या असतात. आज ( दि. 19 ) सकाळी वाशीहून कल्याणला निघालेल्या एनएमएमटीला नागझरी गावाजवळ येताच बिघाड झालं. त्यानंतर बसने अचानक पेट घेण्यास सुरुवात केली. ही बाब वाहनचालकांच्या लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बसबाहेर काढले. त्यामुळे प्रवसी सुखरूप बचावले. बसला लागलेली आग तळोजा एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.
हेही वाचा :