

ठाणे : नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी उमेदवारीसाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिला राज येणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सहा नगराध्यक्षपदेही आरक्षित झाल्याने महिला राज येणार आहे.
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने दिग्गज हिरमुसडले आहेत. अंबरनाथ नगर परिषेदेचे नगराध्यक्ष ही सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहे. तर पालघर नगर परिषेदेचे नगराध्यक्षपद ओबीसींसाठी खुले झाले आहे. डहाणू नगर परिषेदेचे नगराध्यक्ष पद हे खुले झाले असून जव्हार नगरपरिषेदेवर महिला राज येणार आहे.
नगर पंचायती नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून त्या विक्रमगड, मोखाडा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद हे ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. तलासरीमध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेले आहे. राजकीय चढाओढ असलेल्या मुरबाड नगरपंचायती नगराध्यक्ष पद हे खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले असून शहापूर आणि वाडा पंचायत समितीचे नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव झाले आहेत.
कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली असून त्यांची आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले होते. मात्र अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषेदेचे दोन्ही नगराध्यक्षपदे ही महिलांसाठी राखीव झाले असून शहापूर नगरपंचायत महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. फक्त मुरबाड खुल्या वर्गासाठी सुटलेला आहे.