

ठाणे : श्री सिद्धेश्वर तलावामध्ये अचानक हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या महिन्यापासून तापमानाचा पारा वाढत असून उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे तलावाचे पाणी गरम झाल्याने मासे दगावले असल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमी करत आहेत. मृत झालेले बहुतांश मासे हे छोटी पिल्ले आहेत.
श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर तलावाच्या किनाऱ्यावर मासे तरंगत आहेत. मृत होणाऱ्या माशांमध्ये छोटे तसेच मोठ्या माशांचा समावेश आहे. उष्णतेमुळे पाणी गरम होत असून तलावातील ऑक्सिजन कमी झाले असावे. ऑक्सिजन मिळत नसल्याने श्वास घेताना अडचणी निर्माण होऊन मासे मेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.