

ठाणे : महाबोधी विहार मुक्तीसाठी मंगळवार (दि.25) रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिवसैनिक, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील समाजबांधवांनी जांभळी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा 1949 हा रद्द करण्याची प्रमुख मागणी यामध्ये करण्यात येत आहे.
बिहारमधल्या बोधगया इथले महाबोधी विहार हे आजही निर्णायकपणे बौद्धांच्या ताब्यात नाही. तेथील व्यवस्थापन मुख्यत: हिंदूंच्या ताब्यात आहे आणि हा प्रश्न खूप जुना आहे. त्याविरोधात अनेक वेळा आवाज उठवूनही तो अद्याप सुटलेला नाही. सध्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाने जोर पकडला आहे. महाबोधी विहाराच्या परिसरात उपोषणे तसेच देशात विविध राज्यांत आंदोलने सुरू आहेत. जागतिक बौद्ध समुदायाकडून भारत सरकारला अपिले केली जात आहेत.