कल्याण (ठाणे)
अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाकडून ढिगाऱ्यात अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.(छाया : योगेश गोडे )

Thane News | कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; 75 वर्षीय महिला गंभीर जखमी

चौथ्या मजल्यापासून ग्राउंड फ्लोअर पर्यंत स्लॅप कोसळला
Published on

कल्याण (ठाणे) : कल्याणातील कोळसेवाडी परिसरातील श्री सप्तशृंगी व ऑफ हाउसिंग सोसायटीच्या इमारतीचा चौथ्या मजल्यापासून ग्राउंड फ्लोअर पर्यंत स्लॅप कोसळल्यामुळे अनेक जण जखमी झाले असून एक 75 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच कल्याण अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाकडून ढिगाऱ्यात अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news