Naresh Mhaske | मीनाक्षी शिंदे चौकशीला तयार, मग आदित्य-उद्धव ठाकरे का नाहीत? : नरेश म्हस्के

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाकरे गटावर म्हस्केंची टीका; ‘हत्येचे राजकारण करू नये’
Naresh Mhaske on Pradeep Purnekar Case
Naresh Mhaske, Aditya ThackerayPudhari
Published on: 
Updated on: 

Naresh Mhaske on Pradeep Purnekar Case

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या हत्येचा आधार घेऊन ठाकरे गटाकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केला. पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात माजी महापौर मीनाक्षी शिंदे चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत, मग दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे चौकशीला सामोरे का जात नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पूर्णेकर कुटुंबाशी आपले वैयक्तिक संबंध असून, जयनाथ पूर्णेकर हे आजही आपले मित्र असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. ‘‘पूर्णेकर कुटुंब शिवसेनेशी जोडलेले होते. या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल, त्याला पाठीशी घातले जाणार नाही. पोलिसांनी निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई करावी,’’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

Naresh Mhaske on Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Case: राम पुर्णेकरांच्या आरोपांवर मिनाक्षी शिंदे काय म्हणाल्या? वादग्रस्त ऑडिओ क्लिपसंदर्भातही दिलं स्पष्टीकरण

मीनाक्षी शिंदे यांनी स्वतः चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू असताना त्यावरून राजकारण करू नये, असे आवाहन म्हस्के यांनी केले. पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेण्याची आपली इच्छा होती; मात्र प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गैरसमज निर्माण होऊ नयेत आणि तेथील वातावरण लक्षात घेता आपण त्यावेळी जाणे टाळले. आपण लवकरच कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एफआयआरच्या मुद्द्यावरूनही म्हस्के यांनी ठाकरे गटावर प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियन प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांत वेगवेगळे निकष का लावले जात आहेत, असा सवाल केला. संबंधित आरोपांची सत्यता तपास यंत्रणांच्या चौकशीतून स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Naresh Mhaske on Pradeep Purnekar Case
Pradeep Purneakar Murder: 'माझ्या वडिलांच्या हत्येमागे...', प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी मुलाचा मोठा दावा; राजेंद्र शिंदेंवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे म्हस्के यांनी सांगितले. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या ऑडिओचा संदर्भ देत त्यांनी सपना पाटकर प्रकरणाचाही उल्लेख केला. एखाद्या व्यक्तीविरोधात अशा प्रकारे वक्तव्ये किंवा शिवीगाळ केली जात असेल आणि भविष्यात त्या व्यक्तीला काही झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मिठी नदी प्रकरणाचा उल्लेख करत म्हस्के यांनी दिनो मोरया यांच्या अटकेचा संदर्भ दिला. एका प्रकरणात अटक झाली म्हणून दुसऱ्या प्रकरणातही अटक करावी का, असा सवाल त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणातही दिनो मोरया यांचे नाव घेतले जात असल्याचा दावा करत, या प्रकरणांच्या तपासाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

पूर्णेकर हे क्लस्टर योजनेच्या समर्थनात होते, असेही म्हस्के यांनी सांगितले. ‘‘पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखाशी आम्ही आणि आमचे सहकारी जोडलेले आहोत. त्यांच्या दुःखाचे राजकारण होऊ नये,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Naresh Mhaske on Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar death case : पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर - मीनाक्षी शिंदे पतीसह सहआरोपी

ठाण्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली. ठाण्यातील पराभवानंतर एकनाथ शिंदे यांच्याबाबत असूया निर्माण झाली असून, शहरात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाण्यात पक्ष का टिकला नाही, याचे आत्मपरीक्षण ठाकरे गटाने करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. हत्येमागील कारणे आणि आरोपींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी आरोप-प्रत्यारोपांपेक्षा दोषींवर कायदेशीर कारवाई होणे महत्त्वाचे असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news