Shivkalin Weapons Exhibition : प्राच्यविद्येतील शिवकालीन शस्त्रास्त्रांचा खजिना इतिहासप्रेमींसाठी खुला

शस्त्रांसह ऐतिहासिक मौल्यवान दुर्मीळ वस्तू पाहण्‍याची मिळणार संधी
Shivkalin Weapons Exhibition
Shivkalin Weapons Exhibitionpudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : प्राच्यविद्या अभ्यास संस्था (ठाणे) या संस्थेच्या संग्रहालयात अनेक प्राचीन वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात आता शिवकालीन शस्त्रांची भर पडणार आहे. ही शस्त्रे सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील. शस्त्रे आणि इतर अनेक मौल्यवान दुर्मिळ वस्तू पाहण्याच्या संधीचा लाभ इतिहासप्रेमीनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे डॉ. महेश बेडेकर यांनी केले आहे.

सदर शस्त्रे संस्थेच्या संग्रहातील असून त्यांची दुरुस्ती करून आता ती सर्वांना पाहण्यासाठी संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यात उंटावरून मारा करणारी तोफ, तलवारींचे विविध प्रकार, गेंड्याच्या कातडीपासून बनवलेली ढाल, गुप्ती, बिचवा, खंजीर, कट्यार, दांडपट्टा, हत्तींवर ठेऊन मारा करणाऱ्या तोफा इत्यादी अनेक शस्त्रांचा समावेश आहे.

Shivkalin Weapons Exhibition
Dubai Company Fraud : जेएनपीए बंदरात ८४ लाख अमेरिकन डॉलरची फसवणूक

यातील दांडपट्टा हे शस्त्र महाराष्ट्र शासनाने राज्यशस्त्र म्हणून जाहीर केलेले आहे. उंटावरून मारा करणाऱ्या तोफेला उष्ट्रनाळ असेही म्हणतात. मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्या मध्‍ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात या पद्धतीच्या शस्त्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला होता, अशी अनेक मौल्यवान शस्त्रे आणि दुर्मिळ वस्तू पाहण्याच्या संधी संस्थेने उपलब्ध केली असल्याची माहिती संस्थेचे डॉ. महेश बेडेकर यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना दिली.

Shivkalin Weapons Exhibition
Cipla Company DRI Raid : ‘सिप्ला’च्या विक्रोळी कार्यालयासह भिवंडीतील गोदामाची झाडाझडती

या प्रदर्शनासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्था, कला केंद्र, हजुरी दर्गा रोड, उर्दू शाळेजवळ, एलआयसी इमारतीच्या मागे, लुईसवाडी, ठाणे (प ) येथे भेट द्यावी असे आवाहन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.