Thane Municipal Schools: महापालिका शाळांत प्लास्टिक संकलनाची डिजिटल व्यवस्था

'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमांतर्गत प्रत्येक सहभागी शाळेला विशेष पासबुक देण्यात येणार
Thane School Plastic Recycling
Thane School Plastic RecyclingPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्प्रक्रियेसाठी डिजिटल व्यवस्था उभारण्यात येणार आहे. 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमांतर्गत प्रत्येक सहभागी शाळेला विशेष पासबुक देण्यात येणार असून मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्लास्टिक संकलनाची नोंद ठेवली जाणार आहे.

त्यामुळे प्रत्येक शाळेतून पुनर्प्रक्रियेसाठी किती प्लास्टिक पाठविण्यात आले, यावर अचूक देखरेख ठेवता येणार आहे. सातत्याने सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळोवेळी गौरवही करण्यात येणार आहे.

Thane School Plastic Recycling
Thane Voter List SIR: एसआयआर ठाण्‍यात ९ लाख मतदार वगळणार

या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे तसेच बिसलेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अँजेलो जॉर्ज यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेट व वेफर्सची आवरणे, प्लास्टिक पिशव्या, मोबाईल कव्हर्स, शॅम्पूच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी आदी विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा स्वतंत्रपणे गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय विकसित होण्याबरोबरच पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण होण्यास मदत होईल.

यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रत्येक नागरिकाने घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Thane School Plastic Recycling
Teacher Recruitment: पवित्र पोर्टलद्वारे होणार ३०,२०९ शिक्षकांची भरती; उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांपासूनच पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याची आवश्यकता व्यक्त केली. तर बिसलेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अँजेलो जॉर्ज यांनी २०१९ पासून ठाण्यात शाळा आणि गृहनिर्माण संस्थांबरोबर सुरू असलेल्या उपक्रमाला या सहकार्यामुळे अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमाबाबत बोलताना बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि.चे सीईओ डॉ. अँजेलो जॉर्ज म्हणाले,“पर्यावरणात मोठा बदल घडवून आणण्यासाठी रोजच्या छोट्या सवयी महत्त्वाच्या असतात आणि या सवयी लावण्यासाठी शाळांपेक्षा उत्तम ठिकाण दुसरे नाही. ‘बॉटल्स फॉर चेंज’ या उपक्रमाच्या माध्यमातून बिसलेरी 2019 पासून शाळा, गृहनिर्माण सोसायट्या आणि समुदायांसोबत काम करत असून, प्लास्टिक कचऱ्याचे जबाबदारीने व्यवस्थापन करण्याबाबत जनजागृती करत आहे.

'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमात काय विशेष?

  • प्रत्येक सहभागी शाळेला प्लास्टिक संकलनासाठी विशेष पासबुक.

  • मोबाईल ॲपद्वारे संकलनाची डिजिटल नोंद.

  • पुनर्प्रक्रियेसाठी पाठविलेल्या प्लास्टिकचे शाळानिहाय मॉनिटरिंग.

  • सातत्याने सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव.

  • प्लास्टिक कचरा वर्गीकरण, पुनर्प्रक्रियेची सवय लावण्यावर भर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news