Thane Health Services: मनपाच्या आरोग्य केंद्रांच्या कामकाजात सुधारणा करा; अतिरिक्त आयुक्त नितीन राठोड यांचे निर्देश

अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांच्या सूचना; नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय उपकरणांच्या देखभालीकडेही लक्ष देण्याचे आदेश
Thane Health Services
Thane Health ServicesPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य केंद्रांच्या कामकाजात अधिक सुधारणा करून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त २ मेजर डॉ. नितीन राठोड यांनी दिले.

आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची वेळेवर उपस्थिती, औषधांचा पुरेसा साठा, तसेच वैद्यकीय उपकरणांची नियमित देखभालीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Thane Health Services
Delhi Train Cancelled: आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे जाणाऱ्या २१५ हून अधिक गाड्या रद्द; मुंब्य्रातील रेल्वे प्रवासी वाटेतच अडकले

अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

आरोग्य केंद्रांमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. आतापर्यंत आरोग्य केंद्रांनी केलेल्या कामाबद्दल अतिरिक्त आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

Thane Health Services
MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ८० वर्षीय मालन आजींचा पाठिंबा; चारधाम यात्रा सोडून पुण्यात दाखल

मात्र, आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी कामकाजात सतत सुधारणांची गरजही त्यांनी अधोरेखित केली. बैठकी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील प्रशासकीय कामकाज, नोंदवही व अभिलेखांचे व्यवस्थापन, रुग्णांना आवश्यकतेनुसार अन्य रुग्णालयांत संदर्भित करण्याची सेवा, दिव्यांगांसाठी अनुकूल दवाखाने व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

अतिजोखी‍म क्षेत्रांसाठी सूक्ष्म नियोजन तयार करणे, तसेच रेबीज प्रतिबंध व नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.

आरोग्य केंद्रांतील दैनंदिन कामकाज करताना येणाऱ्या अडचणी आणि समस्यांबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अतिरिक्त आयुक्तांनी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

प्रत्येक आरोग्य केंद्राने नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत, असे निर्देशही दिले. कामकाजात अडचण उद्भवल्यास आरोग्य अधिकारी किंवा अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि आरोग्य केंद्रांच्या कार्यप्रगतीची माहिती बैठकीत सादर केली.

प्रभावी आरोग्यसेवा मिळावी

आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत उपस्थित राहणे, औषधांचा साठा पुरेसा आहे की नाही याची नियमित तपासणी करणे, तसेच उपलब्ध वैद्यकीय उपकरणे आणि साहित्याची प्रतिबंधात्मक व नियमित देखभाल योग्य प्रकारे झाली की नाही, याची खातरजमा करण्यावर अतिरिक्त आयुक्तांनी भर दिला.

आरोग्य केंद्रांतील मूलभूत व्यवस्थापन सक्षम करून नागरिकांना वेळेत, प्रभावी आरोग्य सेवा मिळावी, हा बैठकीचा उद्देश असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news