

ठाणे : महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच एकूण 641 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या काही बंडखोर उमेदवारांचादेखील यामध्ये समावेश आहे.
या निवडणुकीत साडेसोळा लाख मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यावेळी पहिल्यादांच मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने ठाणे पालिका निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
येत्या 15 जानेवारी रोजी ठाणे महापालिकेची निवडणूक होणार असून, यासाठी ठाणे महापालिकेचा निवडणूक विभागही सज्ज झाला आहे. निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंगचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीची ठिकाणे, मुख्य स्ट्राँग रूम, चेक पोस्ट आदींवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी 648 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत.