Thane Municipal Election |दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

विनोद घोसाळकरांचा रेखा यादव यांच्‍या समर्थकांवर गुंडगिरीचा आरोप
Thane Municipal Election |दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
Published on
Updated on

Thane Municipal Election 2026

दहिसर विधानसभा प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या हाणामारीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्‍यान, या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर आक्रमक झाले असून, त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार रेखा यादव आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केल्याचा आरोप करत, “शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ,” असा इशाराही घोसाळकर यांनी दिला आहे.

महिलेने केला विनयभंग आणि मारहाणीचा आरोप

या प्रकरणी महिलेने धक्कादायक आरोप करत विनयभंग आणि मारहाणीचा दावा केला आहे. “निवडणुकीचा काळ असला तरी जे काही घडले ते पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही केवळ प्रचार करत होतो. कोणाच्या घरात घुसून जाण्याचा प्रश्नच येत नाही.”

Thane Municipal Election |दहिसरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
Thane Municipal Election : ठाणे महापालिका निवडणुकीत मनसे आक्रमक, बिनविरोध निवडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका

जाणीवपूर्वक गैरवर्तन केल्‍याचा महिलेचा आरोप

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, प्रचारादरम्यान काही लोकांनी जाणीवपूर्वक तिथे लोकांना बोलावून गैरवर्तन केले. “आमची रॅली सुरू असताना मी तिथेच उपस्थित होते. नंतर माझ्या मुलाला फोन करून बोलावण्यात आले. यावेळी माझ्या मागून कुणीतरी आले त्‍याने माझी चेन हिसकावून पळ काढला. मी ओरडल्यावर हाणामारी सुरू झाली,” असा दावा त्यांनी केला. महिलेच्या म्हणण्यानुसार, वाद वाढल्यानंतर काही जणांनी दगडफेकही सुरू केली. “इतकं सगळं सहन करूनही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही मारहाण सुरूच होती.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news