Thane Election 2025: ठाण्यात भाजप मैत्री जपणार? युतीबाबतचा बॉल टाकला शिंदे सेनेच्या कोर्टात

Thane Municipal Corporation Election 2025: शिंदे यांचे युतीतील स्थान लक्षात घेता आणि भारतीय जनता पक्षाला असलेली मित्रांची गरज लक्षात घेता त्यांना दुखवायचे नाही असा धोरणात्मक निर्णय
Eknath Shinde
Eknath ShindePudhari
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • ठाण्यात युती करायची की नाही ते शिंदे यांनी ठरवावे

  • ठाण्यात एकमेकांविरुद्ध लढले तर मते विभाजित होतील

  • भाजपच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांना स्वबळावर लढायची तीव्र इच्छा

Thane Municipal Election 2025 Eknath Shinde Shivsena News

मृणालिनी नानिवडेकर,

ठाणे : महायुती राज्यात काही ठिकाणी एकत्र तर बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढणार असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शक्तिकेंद्र असलेल्या ठाण्याचा निर्णय मात्र त्यांच्या इच्छेनुसार होणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

ठाणे जिल्हा हे एकनाथ शिंदे यांचे सत्ता केंद्र आहे या जिल्ह्यातून त्यांच्या राजकारणाला ऊर्जा मिळते आणि एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावरही अतिशय महत्त्वाचे मित्र नेते असल्यामुळे या ठाण्यात नेमके काय करायचे तो निर्णय त्यांनी घ्यावा भारतीय जनता पक्ष त्या निर्णयाचा आदर करेल असे सांगण्यात आले असल्याचे समजते.

कल्याण- डोंबिवलीत स्वबळावर

कल्याण डोंबिवली या लगतच्या महानगरपालिकेत निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाले आहे. या महानगरपालिकेच्या परिसरात अन्य कोणत्याही पक्षाला विशेष स्थान नसल्यामुळे परस्परांनी सध्या एकमेकांविरोधात उभे राहून नंतर युती करावी असे जवळपास निश्चित झाले आहे.

Eknath Shinde
Telangana Naxalites | तेलंगणाच्या बाजूस लपलेत नक्षली?

मुंबईत युतीच

मुंबई महानगरपालिकेची अतिशय महत्त्वाची लढाई स्वबळावर लढण्या ऐवजी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे कर एकत्रितपणे लढणार आहेत. मुंबईत युती होणार हे जवळपास निश्चित आहे, हे वास्तव आता बदलणार नाही असा विश्वास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आहे. मुंबई आणि कल्याण डोंबिवली या दोन शहरांच्या मध्ये असलेले ठाणे मात्र अतिशय महत्त्वाचे ठिकाण झाले असून येथे काय करायचे हा निर्णय मोलाचा ठरणार आहे.

ठाण्यात महायुतीचा तिढा का निर्माण झालाय?

ठाण्यात नेमके काय करायचे हा दोन्ही पक्षांसमोर प्रश्न आहे. अँटी वातावरणामुळे शिंदे यांची ताकद काहीशी कमी होऊ शकेल असेही त्यांच्या पक्षाला वाटते आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध लढले तर मते विभाजित होतील अशी परिस्थिती आहे.

भाजपच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांना स्वबळावर लढायची तीव्र इच्छा आहे. मात्र शिंदे यांचे युतीतील स्थान लक्षात घेता आणि भारतीय जनता पक्षाला असलेली मित्रांची गरज लक्षात घेता त्यांना दुखवायचे नाही असा धोरणात्मक निर्णय झाला असल्याचे समजते. याबाबत नेमके काय करावे ते शिंदे यांनी सांगावे आम्ही त्या निर्णयाचा आदर करू असे त्यांना गेल्या आठवड्यात दोनदा सांगण्यात आले आहे. शिंदे यांनी ठाण्यात युतीची तयारी दाखवल्यास ते भारतीय जनता पक्षाला ते मागतील त्या जागा देऊ शकतील का? हा मुद्दा आहे आणि युती करायची नाही असे ठरवल्यास भारतीय जनता पक्ष ठाणे परिसरात स्वबळावर पाय रोवू होऊ शकतो का? याचाही शिंदे यांना विचार करावा लागणार आहे. भारतीय जनता पक्षांनी शिंदे यांना महत्त्व देताना ठाण्यात नेमके काय करायचे ते तुम्ही ठरवा आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत असेच सांगत स्वतःच्या पक्षाच्या वाढीचा पर्यायही खुला ठेवला असल्याचे मानले जाते.

Eknath Shinde
Maharashtra Politics: धक्कातंत्र गुजरातमध्ये, धसक घेतला महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी; लाल दिवा कायम ठेवण्यासाठी लागले कामाला

2017 मध्ये ठाणे महापालिकेतील पक्षीय बलाबल काय होते?

2017 मध्ये ठाणे महापालिकेची निवडणूक पार पडली होती. यात शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली होती. 131 पैकी 67 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तर भाजपाचे 23 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेस पक्षाला फक्त तीन जागांवर विजय मिळाला होता. एआयएमआयएम पक्षाचे दोन नगरसेवक तर इतर पक्षांचे दोन नगरसेवक निवडून आले होते. 1997 नंतर पहिल्यांदाच ठाण्यात स्वबळावर शिवसेनेचा महापौर झाला होता. या विजयाचे श्रेय त्यावेळी एकनाथ शिंदेंनाच देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली असून शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. कोरोना काळामुळे 2017 नंतर महापालिका निवडणुका झाल्या नव्हत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news