Thane blockchain project: ठाणे महानगरपालिका कामांच्या अनियमिततेला बसणार चाप

पारदर्शक, सुरक्षित व वेगवान कारभारासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
Thane blockchain project
Thane blockchain projectPudhari
Published on
Updated on

ठाणे: नागरिकांना अधिक पारदर्शक, कार्यक्षम, सुरक्षित आणि अपरिवर्तनीय डिजीटल सेवा देण्यासाठी ठाणे महापालिका ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. या उपक्रमासाठी सुमारे 48 लाख 97 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद नसल्यामुळे आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 72 (ब) अंतर्गत आर्थिक दायित्व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या 150 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स व्यवस्थेनुसार हे अत्याधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञान ठाणे महापालिकेत अवलंबण्याचे प्रस्तावित आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महापालिकेच्या विविध नागरी सेवांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत.

Thane blockchain project
Maharashtra new districts: राज्यात होणार 11 नवीन जिल्ह्याची निर्मिती?

ब्लॉकचेनवर आधारित डिजिटल जन्म व मृत्यु दाखल्यांमुळे बनावट कागदपत्रांना आळा बसुन पडताळणी प्रक्रिया जलद आणि विश्वासार्ह होईल. सेवा हमी कायद्यांतर्गत मालमत्ता कर कागदपत्रे, विविध प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा वेळेत आणि सुरक्षितरीत्या उपलब्ध होतील.

अग्निशमन, आरोग्य आणि बांधकाम विभागाकडून दिले जाणारे परवाने व ना-हरकत प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येतील. या उपक्रमासाठी 48 लाख 97 हजार निधीची गरज आहे. मात्र, माहिती वा तंत्रज्ञान विभागाकडे अर्थसंकल्पीय तरतुद उपलब्ध नसल्याने या निधीच्या आर्थिक दायित्व स्वीकृतीसाठी मनपा आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील 72 (ब) अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका सुत्रांनी दिली.

Thane blockchain project
Kalyan Crime: संतापजनक घटना! पित्याने केला अडीच वर्षांच्या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला

सायबर हल्ल्यापासुन संरक्षण

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे एकदा नोंद झालेली माहिती बदलता येत नाही. शिवाय महापालिकेचा संवेदनशील डेटा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहणार असून छेडछाड करणे जवळपास अशक्य होईल. तसेच सुरक्षितता, क्रिप्टोग्राफिक हॅश मुळे माहिती अत्यंत सुरक्षित राहुन माहिती व डेटाशी छेडछाड करणे कठीण होते.

काय आहे ब्लॉकचेन?

ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान एक विकेंद्रित आणि सुरक्षित डिजिटल खातेवही तंत्रज्ञान आहे. यामध्ये माहिती ‌‘ब्लॉक्स‌’ मध्ये साठवली जाते आणि हे ब्लॉक्स साखळी प्रमाणे एकमेकांना जोडलेले असतात.व्यवहार ‌‘ब्लॉक‌’मध्ये नोंदल्या नंतर नेटवर्कमधील संगणक त्याची पडताळणी करतात. तसेच विकेंद्रीकरण करून माहिती एका सर्व्हरवर न ठेवता अनेक संगणकांवर साठवली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news