Umesh Birari Suspended | ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित

मुंबई उपविभागीय अधिकारी असताना मूळ मालकाऐवजी विकासकाला ६० कोटींचा फायदा करून देण्याचे प्रकरण भोवले
TMC Deputy Commissioner Suspension
Umesh Birari Pudhari
Published on
Updated on

Thane Municipal Corporation Deputy Commissioner Suspension

ठाणे : ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांना निलंबित करण्यात आले आहे.उमेश बिरारी यांच्याकडे मुंबई उपनगरचे उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार असताना त्यांनी बोरिवली येथील भूसंपादन प्रकरणात मोबदला निश्चित करताना जमिनीचे चुकीचे मूल्यांकन करून मूळ मालकाऐवजी तसेच मालकाच्या संमतीशिवाय विकासकाला ६० कोटींचा फायदा करून देण्याचे प्रकरण त्यांना भोवले आहे.

या प्रकरणामुळे राज्य शासनाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांना आता ठाणे महापालिका मुख्यालयाच्या ऐवजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत.

TMC Deputy Commissioner Suspension
Thane Political News : मंत्री सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद चिघळला...

राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले उमेश बिरारी हे सध्या ठाणे महापालिकेत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असून ठाणे पालिकेचे तत्कालीन उपायुक्त शंकर पाटोळे यांना निलंबित केल्यानंतर अतिक्रमण विभागाचा कारभार बिरारी यांच्यावर सोपवण्यात आला.

उमेश विरारी हे मुंबई उपनगरचे उपविभागीय अधिकारी असताना मौजे बोरिवली तालुका बोरिवली येथील न.भू.क्र. ४५४, ४५६, ४५७, ४५७ (२ ते ३), ४५८ व ४५८ (१ ते १०) या मिळकतीच्या भूसंपादन प्रकरणात मोबदला निश्चित करताना जमिनीच्या दरांऐवजी सदनिकांच्या विक्री व्यवहारांवरून चुकीचे मूल्यांकन करणे, भारग्रस्त जमिनीसाठी आवश्यक वजावट न करणे, निवाड्यात मूळ मालकांऐवजी केवळ विकासक यांचे नाव नमूद करणे, मूळ मालकांच्या संमतीशिवाय मोबदला रक्कम ६०.३० कोटी थेट विकासकाला वितरित करणे, निवाडा पारित करताना वरिष्ठ कार्यालयाच्या तोंडी पातळीवर दिलेल्या निर्देशांचे पालन न करणे, वरिष्ठ कार्यालयाच्या संमतीशिवाय सुधारित निवाडा घोषित करणे, अशी अनियमितता केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे बिरारी यांच्याविरोधात २० जुलै २०२५ रोजी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली.

TMC Deputy Commissioner Suspension
Thane Crime News: टीव्हीवरून वाद; वडिलांनी मुलगी, पत्नी, नातीवर केला चाकू हल्ला

बिरारी यांनी केलेली अनियमितता महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन करणारे असल्याचे उघड झाल्याने त्यांना निलंबित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.अवर सचिव प्रवीण पाटील यांनी बिरारी यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. निलंबनाच्या कालावधीत उमेश बिरारी यांना आता ठाणे महापालिकेच्या ऐवजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाशिवाय त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय सोडण्याची परवानगी नसेल.

अतिक्रमण विभागासाठी पुन्हा होणार लॉबिंग?

उमेश बिरारी यांना निलंबित करण्यात आल्याने ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपयुक्त पद पुन्हा रिकामे झाले आहे. शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात निलंबित केल्यानंतर ही जबाबदारी बिरारी यांच्यावर मोठ्या विश्वासाने पालिका आयुक्तांनी दिली होती. मात्र त्यांनी लक्षात येईल अशी फारशी कामगिरी केली नाही. या पदासाठी बरेच अधिकारी इच्छुक असल्याने या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news