Thane Mahapalika Jobs: ठाणे महापालिकेत मेगाभरती! दोनच दिवसांत तब्बल 12 हजार अर्ज, अंतिम तारीख 2 सप्टेंबर; पगार 25 हजार +

Thane Municipal Corporation Recruitment 2025: अंतिम मुदतीपर्यंत 1,773 जागांसाठी 3 लाखांवर अर्ज येण्याची शक्यता
Thane Municipal Corporation Recruitment 2025 notification
Thane Municipal Corporation Recruitment 2025 notificationPudhari
Published on
Updated on

Thane Municipal Corporation August 2025 Recruitment

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनावर विविध पदांसाठी मेगा भरती होणार असून यासाठी दोन दिवसांपूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच नोकरीसाठी अक्षरशः अर्जाचा पाऊस पडला असून या दोन दिवसांत तब्बल 12 हजार अर्ज आले असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पाचशे पेक्षा अधिक अर्जदारांनी परीक्षा शुल्क देखील भरले आहे. अर्जदारांचा असाच वेग राहिला तर अंतिम मुदतीपर्यंत हा आकडा अडीज ते तीन लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणार्‍या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ठाणे महापालिकेचे सुवर्णसंधी चालून आली आहे. ठाणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरु झाली असून लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय विभागातील अशी एकूण 1 हजार 773 रिक्त पदांकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील गट - क व गट - ड मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

Thane Municipal Corporation Recruitment 2025 notification
Thane property penalty removal : ठाण्यातील दीड लाख अनधिकृत मालमत्तांवरील दंड माफ होणार...

शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणार्‍या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र इत्यादी बाबी प्रवेशपत्रामध्ये देण्यात येणार आहेत. दरम्यान 11 नोव्हेंबरला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर मागील दोन दिवसांत अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला असून या दोन दिवसांत तब्बल 12 हजार अर्ज आल्याने अंतिम मुदतीपर्यंत हा आकडा अडीज ते तीन लाखांवर जाण्याचा अंदाज प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

परीक्षा शुल्क किती?

अमागास प्रवर्ग: रु.१,०००/-

मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग : रु.९००/-

माजीसैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी शुल्क माफ राहील.

Thane Municipal Corporation Recruitment 2025 notification
Thane Metro : ठाणेकरांसाठी Good News ! सप्टेंबरमध्ये होणार मेट्रोची ट्रायल रन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

www.thanecity.gov.in या वेबसाईटवर जा.

पदभरती 2025 या टॅबवर क्लिक करा.

रजिस्टर किंवा लॉग इन करा आणि अर्ज करा.

विभागनिहाय पद आणि वेतन जाणून घेण्यासाठी पीडीएफ डाऊनलोड करा (Thane Municipal Corporation Recruitment 2025 Notification PDF)

Attachment
PDF
Newspaper advertisement
Preview

एकापेक्षा अधिक जागांवर अर्ज करायचे असल्यास शुल्क किती?

एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वस्तंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेत कोणकोणत्या पदांसाठी भरती होत आहे?

ठाणे महापालिकेने ऑगस्ट 2025 मध्ये गट- 'क' व गट 'ड' मधील रिक्त 1,773 पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यात सहायक परवाना निरीक्षक,लिपीक, सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, वाचा उपचार तज्ञ, डायटिशियन, फिजि फजिओथेरपिस्ट, वॉर्डबॉय, दवाखाना आया अशा विविध पदांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news