Dombivli fire News
डोंबिवलीत मंडप गोडाऊनला भीषण आग लागली.

ठाणे : डोंबिवलीत मंडप गोडाऊनला भीषण आग

Dombivli fire : शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
Published on

डोंबिवली : डोंबिवलीतील पूर्वेकडील पाथर्ली रोडला असलेल्या पोटेश्वर मंदिरासमोरच्या मंडप गोडाऊनला सोमवारी (दि.४) रात्री सुमारास अचानक आग लागली. या आगीत मंडप गोडाऊन भस्मसात झाला. ही आग शार्ट सर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

Dombivli fire News
कणकवली शहरातील आरबी बेकरीसह मेडिकल स्टोअर्सला मोठी आग

या आगीची झळ जवळील इमारतीला बसली होती. तथापी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. शेजारीच रहिवासी इमारत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. या गोडाऊनमध्ये मंडपासाठी लागणारे कापड, काथ्याच्या दोऱ्या, लाकडे, बांबू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक कयास आहे. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Dombivli fire News
अंधेरीत रिया पॅलेसमध्ये आग, तिघांचा होरपळून मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news