Kalyan Missing Case | कल्याण रेल्वे स्थानकातून २५ वर्षीय तरूण रहस्यमयरित्या बेपत्ता

घरात आढळलेल्या भावनिक चिठ्ठीमुळे खळबळ, लोहमार्ग पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल
Missing Person Case |
Missing Person Case
Published on: 
Updated on: 

Kalyan Railway Station Young Man Missing

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकातून २५ वर्षीय तरूण रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून हेमंत अशोक शर्मा असे बेपत्ता तरूणाचे नाव आहे. हा तरूण गेल्या एक वर्षापासून नैराश्याने ग्रस्त असल्याची माहिती असून त्याच्या खोलीमध्ये सापडलेल्या एका वहित भावनिक चिठ्ठी आढळून आल्यानंतर कुटुंबीयांनी अनर्थाची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या संदर्भात पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार बेपत्ता हेमंतचे वडील अशोक साहबसिंग शर्मा (६१ रा. पिसवली गाव, कल्याण-पूर्व) यांनी सांगितले की त्यांचा मुलगा २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त मुंबईतील मालाड येथे जाण्यासाठी घरातून निघाला. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याने कुटुंबीयांना फोन करून कसारा लोकल पकडल्याची माहिती दिली.

Missing Person Case |
Kalyan Accident | कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर भरधाव कार हवेत उडून थेट शेतात!

त्यानंतर त्याचे वडील त्याला घेण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाटावर पोहोचले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हेमंत पाण्याची बाटली घेण्यासाठी स्थानकातील कॅन्टीनकडे गेला. मात्र तो परत आलाच नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.

घरात सापडली भावनिक चिठ्ठी

कुटुंबीयांनी घरी पोहोचल्यानंतर हेमंतच्या खोलीची झडती घेतली असता तेथे एका निळ्या रंगाच्या वहिवर लाल पेनने लिहिलेला संदेश आढळून आला. या संदेशात हेमंतने लिहिले होते की तो परत येणार नाही, ओम नमः शिवाय हेच सत्य आहे आणि हे स्वीकारावे, तसेच त्याने लिहिले होते की त्याला शोधण्याची गरज नाही, कारण असे करणे सर्वांसाठी चांगले राहील, संदेशाच्या शेवटी त्याने आपल्या प्रवासाला जाण्याचा आणि पुन्हा भेटण्याचा उल्लेखही केला होता.

Missing Person Case |
Kalyan Hit and Run Case : आमदाराचे स्टिकर असलेल्या मर्सिडीजने चिरडून मृत्यू

अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय 

ही चिठ्ठी समोर आल्यानंतर कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली असून कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली. हेमंतच्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन एखाद्या अज्ञात व्यक्तीने भुलवून त्याला आपल्यासोबत नेले असावे किंवा तो एखाद्या अज्ञात ठिकाणी निघून गेला असावा. या प्रकरणी बेपत्ता हेमंतचे वडील अशोक शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहमार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४० (३) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news