Kalyan Accident | कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर भरधाव कार हवेत उडून थेट शेतात!

कारचा चक्काचूर: तिघे किरकोळ जखमी ; कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले
Kalyan Accident | कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर भरधाव कार हवेत उडून थेट शेतात!
Published on: 
Updated on: 

कल्याण : - कल्याण पश्चिमेतील गांधारी रिंग रोड परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरून उडून थेट शेतात जाऊन कोसळली. या कारमध्ये दोन तरुण आणि एक तरुणी असे तिघे जण प्रवास करत होते. अपघातात तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना कारमधून सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कल्याण पश्चिमेतील गांधारी रिंग रोड परिसरात भरधाव कार थेट शेतात घुसल्याची घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास ही कार वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्यावरून उडून थेट शेतात जाऊन पडली.

या अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताच्या वेळी कारमध्ये दोन तरुण आणि एक तरुणी प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदत करत तिघांनाही कारमधून बाहेर काढले. तिघेही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने मोठी दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. भरधाव कार थेट शेतात घुसल्याने परिसरात हा अपघात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news