Kalyan Rabid Dog Captured | कल्याणातील पिसाळलेल्या श्वानाची दहशत अखेर संपुष्टात; मध्यरात्री पोलिसांनी केले जेरबंद

केडीएमसीची प्रतीक्षा संपवून पोलिसांनी श्वानाला केले जेरबंद; सुमारे १५० नागरिकांना चावा
Kalyan Police  Rabid Dog Captured
Kalyan Police Rabid Dog CapturedPudhari
Published on
Updated on

Kalyan Police Rabid Dog Captured

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरात रविवारी पिसाळलेल्या भटक्या श्वानाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी दोन वाजल्यापासून रात्रीपर्यंत या श्वानाने पादचारी, रहिवासी तसेच रिक्षा आणि दुचाकीस्वारांच्या मागे धावत अनेकांना चावे घेतले.

दिवसभरात सुमारे १५० नागरिक श्वानदंशाचे बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे. अखेर मध्यरात्री पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सिंडीकेट परिसरातून या श्वानाला जेरबंद केले. श्वान पकडल्याची माहिती मिळताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Kalyan Police  Rabid Dog Captured
Kalyan Railway Station Traffic | कल्याण रेल्वे स्थानक परिसर वाहतूक कोंडीमुक्त : वाहतूक नियंत्रण शाखेची विशेष मोहीम

संदीप हॉटेल परिसर, बिर्ला महाविद्यालय रस्ता, जुने आरटीओ कार्यालय आणि भोईरवाडी भागात या श्वानाने नागरिकांच्या मागे धावत अचानक हल्ले केले. त्यामुळे रविवारची सुट्टी असूनही अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. सोसायट्यांच्या आवारात आणि मैदानांवर मुलांना खेळण्यासाठी पाठविण्यासही पालकांनी मनाई केली.

श्वानदंश झालेल्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाली. रुक्मिणीबाई रुग्णालयात सुमारे १५० जणांची नोंद झाली असून, त्यापैकी २५ जणांना दाखल करून उपचार करण्यात आले. एका ११ वर्षीय मुलीवर श्वानाने गंभीर हल्ला केल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Kalyan Police  Rabid Dog Captured
Gutkha Seized Kalyan | कल्याणमध्ये भाजी विक्रेत्याच्या आड गुटख्याचा गोरखधंदा; ४८ लाखांचा साठा जप्त

दरम्यान, श्वानाची दहशत सुरू असतानाही केडीएमसीकडून तातडीने कारवाई झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि अशा उपद्रवी श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news