Gutkha Seized Kalyan | कल्याणमध्ये भाजी विक्रेत्याच्या आड गुटख्याचा गोरखधंदा; ४८ लाखांचा साठा जप्त

गुजरातमधून आणलेला प्रतिबंधित गुटखा रिक्षातून वितरित करण्याचा प्रयत्न; मानपाडा पोलिस व एफडीएची संयुक्त कारवाई
 Gutkha seized
Gutkha seized (File Photo)
Published on
Updated on

Kalyan FDA Action

डोंबिवली : गुजरातमधील वापी येथून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आणून तो कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षातून वितरित करणाऱ्या भाजी विक्रेत्याला मानपाडा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने खोणी गाव परिसरात ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ४८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली परिसरातील अवैध खाद्यपदार्थ विक्री व प्रतिबंधित गुटख्याविरोधात कारवाई सुरू आहे. त्याचदरम्यान मानपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत ढोले यांना मिळालेल्या माहितीनुसार काटई-बदलापूर मार्गावरील खोणी येथील निसर्ग हॉटेल चौकात सापळा रचण्यात आला.

 Gutkha seized
Kalyan News : केडीएमसी चालकाचा दारूच्या नशेत प्रताप; फेरीवाल्यांकडे हप्ता मागणे पडले महाग, बेदम धुलाई!

संशयित रिक्षा येताच पथकाने चालक शंकर शिवप्रसाद पांडे (वय ३१) आणि प्रवासी दिलीप अनिल कुरसुंगे (वय ३७) यांना ताब्यात घेतले. रिक्षातील गोणीत विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू, रजनीगंधी, जम्बो तंबाखू, तुलसी रॉयल जाफरानी आदी प्रतिबंधित पदार्थ आढळून आले.

चौकशीत हा साठा गुजरातमधील वापी येथून आणल्याची माहिती कुरसुंगे याने दिली. मात्र, माल कुणाकडून आणला आणि कुठे विक्री करणार होता, याबाबत त्याने स्पष्ट माहिती दिली नाही. अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र कोडग यांच्या फिर्यादीवरून कुरसुंगेविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news