Thane Infrastructure Projects : ठाणे शहरातील प्रलंबित कामे गतीने पूर्ण करा

महापालिकेच्या विकासकामांचा आयुक्तांनी घेतला आढावा; कामांच्या गुणवत्तेसाठी कानपिचक्या
Thane Infrastructure Projects
Thane Infrastructure Projects pudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज प्रकल्प संनियंत्रण बैठकीत घेतला. यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजिवडा येथे स्थलांतर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम व नूतनीकरण, के. व्हिला नाल्यावरील पुलाचे काम, मेंटल हॉस्पिटल परिसरातील नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, दिवा रेल्वे उड्डाणपूल तसेच दिवा परिसरातील रस्त्यांची कामे, ठाणे शहरातील पार्किंग समस्या आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त 2 मेजर डॉ. नितीन राठोड, नगर अभियंता सुरेंद्रकुमार काटकर, उपायुक्त दीपक झिंजाड, वैभव आवारे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांच्यासह उपनगर अभियंते आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

Thane Infrastructure Projects
Raigad Tree Cutting : साई डोंगरातील वृक्षतोडीवरून विरोधक आक्रमक

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय माजिवडा येथे स्थलांतरित करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक इमारतीचे काम सुरू आहे. या प्रकल्पात कोणत्याही प्रकारचा अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांनी परस्पर समन्वयाने काम करावे. प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक तांत्रिक बाबींची वेळेत पूर्तता करून कामाला गती द्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, कामाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याबाबतही त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या.

के. व्हिला नाल्यावरील पुलाच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या पुलाच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्या घरांबाबत तोडगा काढण्यात आला असून, उर्वरित बाधित रहिवाशांचे खोपट येथील रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतर करून पुढील काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रकल्पातील उर्वरित अडचणी तातडीने दूर करून पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्याने उभारण्यात येत असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे कामामधे विस्थापित होणाऱ्या रहिवासी यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुढील आठवड्याज लोकप्रतिनिधीं यांचे समन्वयाने बैठक आयोजित करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

दिवा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामातील प्रगतीचा आढावा घेताना आवश्यक भूसंपादन, संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय आणि प्रलंबित बाबींची पूर्तता यावर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडथळा ठरणाऱ्या बाबी तातडीने दूर करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी, असे आयुक्तांनी सांगितले. पुलासाठी आवश्यक असलेले भूसंपादन संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून पूर्ण करावे. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई करावी. दिवा परिसरात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांची सद्यस्थितीही आयुक्तांनी जाणून घेतली.

Thane Infrastructure Projects
Monterosa Project Pune: बिल्डर, आर्किटेक्टसह दोन अभियंत्यांवर कारवाईचा बडगा; 'माँटेरोझा' गृह प्रकल्पाला महापालिकेचा दणका

दिवा-शीळ रोडचे काँक्रिटीकरण तसेच रस्ता रुंदीकरणाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करून कामाला गती द्यावी. या कामांमध्ये कोणताही अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.कामाच्या गुणवत्तेत त्रुटी राहणार नाहीत, तसेच प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण होतील, याची जबाबदारी संबंधितांनी घ्यावी, असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुविधांचे आधुनिकीकरण

माजिवडा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे आधुनिकीकरण, ऑक्सिजन पाइपलाइनची उभारणी आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक असलेल्या अन्य सुविधांच्या कामांचा आढावा घेऊन ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. रुग्णांना दर्जेदार, सुरक्षित आणि अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे त्यांनी नमूद केले. तसेच, अतिरिक्त आयुक्त २ मेजर डॉ. नितीन राठोड यांनी रुग्णालयातील कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.