Thane Power Outage: ठाण्यात रविवारी पहाटे वीजपुरवठा खंडित; घोडबंदर-वसंत विहार परिसरातील ६५ हजार ग्राहकांना फटका

पडघा वीजवाहिनी ट्रिप झाल्याने पातलीपाडा उपकेंद्रावर परिणाम; पाच तासांनंतर महावितरणकडून पुरवठा पूर्ववत
Thane Power Outage
Thane Power OutagePudhari
Published on
Updated on

ठाणे : रविवारी सुट्टीच्या दिवशीच पहाटेपासूनच घोडबंदर, वसंत विहार आणि कोलशेत या भागांचा वीजपुरवठा तब्बल पाच तास खंडित झाला होता. पहाटे सहा वाजल्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत करण्यासाठी साडेअकरा वाजले. घोडबंदर येथील पातलीपाडा उपकेंद्राशी संबंधित असलेली पडघा येथील वीज वाहिनी ट्रिप झाल्याने वीज पुरवठा झाला खंडित झाल्याचे कारण देण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे 65 ते 70 हजार वीज ग्राहकांना याचा फटका बसला.

Thane Power Outage
Ullas Nav Bharat Literacy Programme: 1 लाख आजी-आजोबांची परीक्षा; ‘उल्लास’ साक्षरता चाचणीत आजी-आजोबांची शाळेकडे धाव

आधीच उन्हामुळे गर्मीच्या झळा सोसणाऱ्या ठाणेकरांना रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी पाच तास गर्मीत काढावे लागले. वीजपुरवठा पहाटे सहा वाजताच खंडित झाल्याने काय करावे हे नागरिकांना समजलेच नाही. लाईट आता येईल थोड्या वेळाने येईल या प्रतीक्षेत नागरिकांनी पाच तास काढले. अखेर पाच तासांनी हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

Thane Power Outage
Zaveri Bazaar Gold Fraud: अठरा कोटींचे सोन्याचे दागिने घेऊन कारागिराचे पलायन; वर्कशॉप बंद करून फरार

या बिघाडामुळे कोलशेत, वसंत विहारच्या दोन्ही बाजूचा, घोडबंदर येथील मानपाडा, पातलीपाडा, कासारवडवली, ओवळा आणि पुढे गायमुख पर्यंत हा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे या सर्व परिसरातील 65 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना या सर्व प्रकारचा फटका बसला.

Thane Power Outage
Mumbai Rain: मुंबईत उकाड्यानंतर दिलासा; 31 मार्चपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

घोडबंदर परिसरातील पातलीपाडा येथील उपकेंद्राशी संबंधीत असलेल्या पडघा येथील वीजवाहिनी ट्रिप झाल्याने हा सर्व प्रकार घडला. पडघा येथील वीजवाहिनीत ट्रिप झाल्याने याचा भार पातलीपाडा येथील वीजवाहिनीला सहन न झाल्याने हा वीजपुरवठा खंडित झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news