Thane News : डोंबिवलीतील कुंभार खान पाडा खाडीत बापलेक बुडाले

Thane News : डोंबिवलीतील कुंभार खान पाडा खाडीत बापलेक बुडाले

Published on

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली पश्चिमेकडील कुंभार खान पाडा गणेश घाट खाडीत ५ वर्षांची मुलगी आणि तिचे वडील खाडीत बुडल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान शोध घेत आहेत. ही घटना आज (दि.२३) दुपारी एकच्या सुमारास डोंबिवली पश्चिमे कडील कुंभारखान पाडा खाडीत घडली. अनिल सुरवाडे, हिरा सुरवाडे असे बुडालेल्या बापलेकीचे नाव आहे. खाडीत हे दोघे बुडत असताना एका व्यक्तीने पाहिले. त्याने पोलीस व अग्निशामक दलाला कळवले. Thane News

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, डोबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी अनिल सुरवाडे व त्यांची पाच वर्षाची मुलगी हिरा सुरवाडे आले होते. ती मुलगी खेळत असताना ती खाडी किनारी गेली. भरती असताना पाणी वर आल्याने अचानाक ती पाण्यात पडली. अनिल यांने तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचविण्यासाठी धावला. मात्र, तोपर्यंत ते दोघेही बुडाले होते. त्याने याबाबतची माहिती माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना दिली. Thane News

त्यांनी घटनास्थळी धाव घेत याची माहिती विष्णूनगर पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलीस पथकासोबत खाडी किनारी पोहोचले. फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले. अद्याप त्यांचा शोध सुरु आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news