Dombivli Crime | समलिंगी संबंधाची इच्छा, घरी आलेल्या तरुणाने चोरले दागिने; डोंबिवलीतील तरुण गजाआड

डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख निर्माण करून भेटीसाठी घरी गेल्यानंतर दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार डोंबिवलीत उघडकीस
Jewelry Theft Dombivli
Jewelry Theft Dombivli Pudhari
Published on
Updated on

Jewelry Theft Dombivli

डोंबिवली : डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख निर्माण करून भेटीसाठी घरी गेल्यानंतर दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी प्रवीण बोचरे याला अटक केली आहे. पोलीस चौकशीत अशाच स्वरूपाची आणखी एक घटना समोर आल्याने प्रवीणने अनेकांना लुबाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

डोंबिवलीत राहणाऱ्या एका व्यक्तीची LGBTQ समूहासाठी सुरू केलेल्या डेटिंग ॲपच्या माध्यमातून प्रवीणशी ओळख झाली. यानंतर फिर्यादीने प्रवीणला घरी बोलावले होते. काही वेळाने प्रवीण घरुन निघून गेला. त्यानंतर फिर्यादीने घरातील दागिने तपासले असता सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले.

Jewelry Theft Dombivli
Dombivli Crime: डोंबिवलीत भररस्त्यात तुफान राडा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; पोलीस कारवाई करणार?

हा प्रकार लक्षात येताच मोठा धक्का बसला

या घटनेनंतर प्रवीणविरोधात तक्रार करायची की नाही, पोलिसात तक्रार केल्यास काय होईल? असा प्रश्न फिर्यादीसमोर निर्माण झाला होता. प्रकरणाचे स्वरूप वैयक्तिक आणि संवेदनशील असल्याने सुरूवातीला त्याने तक्रार करण्यास संकोच केला. अखेर मित्रांशी चर्चा केल्यानंतर त्याने विष्णूनगर पोलिस ठाणे गाठून घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी प्रवीणला बेड्या ठोकल्या.

अनेकांना लक्ष्य केल्याचा संशय

उपलब्ध माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन प्रवीण बोचरे याला अटक केली. अटकेनंतर त्याची न्यायालयीन प्रक्रियेनुसार आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अशाच पद्धतीची आणखी एक घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Jewelry Theft Dombivli
Dombivli Crime | डोंबिवलीतील तरूणीच्या मृत्यूचा उलगडा: तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न, प्रियकराला बेड्या

त्यामुळे आतापर्यंत अशा स्वरूपाच्या दोन घटना समोर आल्या असून या दोन्ही घटनांमध्ये एकाच प्रकारची पद्धत वापरण्यात आली आहे का ? आरोपीने आणखी किती जणांना अशाच पद्धतीने लक्ष्य केले आहे ? याचा सखोल तपास पोलिस करत आहेत. ऑनलाईन डेटिंग किंवा अनोळखी व्यक्तीशी ॲपवरून संपर्क साधताना वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षेबाबत नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news