Dombivli Crime: डोंबिवलीत भररस्त्यात तुफान राडा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; पोलीस कारवाई करणार?

पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा शंकर मंदिरासमोर एका स्थानिक रहिवाशाला सशस्त्र टोळक्याने शिवीगाळ करत मारहाण
Dombivli Crime
Dombivli Crimepudhari photo
Published on
Updated on

Gangster Attack In Dombivli

डोंबिवली :
पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा शंकर मंदिरासमोर एका स्थानिक रहिवाशाला सशस्त्र टोळक्याने शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांसह लाकडी दांडक्याच्या साह्याने बेदम मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी अर्थात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे कुंभारखाणपाडा परिसरातील रहिवाशांकडून सांगण्यात आले. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास पुन्हा मारण्याची धमकी दिल्यामुळे भयभीत झालेल्या जखमी रहिवाशाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याची चर्चा आहे.

कुंभारखाणपाडा परिसरातील चौकात मध्यरात्रीच्या सुमारास काही तरूण हातात दांडके घेऊन उभे असतात. काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे टोळके कुंभारखाणपाड्यातील शंकर मंदिरासमोर उभे होते. सुरूवातीला हे टोळके चौकात ठिकठिकाणी उभे होते. एक जणाच्या हातात दांडके घेऊन अन्य एका जणाच्या अंगावर धावत होता. झटापटी सुरू असताना, दोन ते तीन जणांनी अचानक शंकर मंदिरासमोरील गल्लीत जाऊन एक जणाला पकडून ठेवले. शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण सुरू केली. या टोळक्याने नंतर दांडक्याच्या साह्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्याने टोळक्याच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र टोळक्याने त्याला यथेच्छ बदडून काढले.

Dombivli Crime
Dombivli Crime News: डोंबिवलीत उच्चभ्रू लोकवस्तीत चालणारे छुपे रॅकेट उघड

 सार्वजनिक रस्त्यावर मोठ्याने ओरडाओरडा करत हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील सोसायट्यांमधील रहिवासी हा सारा प्रकार पाहत होते. अनेक रहिवाशांनी या हाणामारीचे व्हिडीओ काढून समाज माध्यमांवर व्हायरल केले. मंगळवारी सकाळपासून या हाणामारीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. हा व्हिडिओ कुंभारखाणपाडा भागातील शंकर मंदिर समोरील असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

कुंभारखाणपाड्यातील स्थानिक रहिवाशांनी व्हिडीओ पाहून सांगितले, की मारहाण होत असलेल्या व्यक्तीला एका राजकीय व्यक्तीशी संबंधित व्यक्ती आणि त्याचे साथीदार मारहाण करत होते. असे प्रकार या परिसरात वारंवार घडत असतात. मात्र आता हे प्रकार वाढले असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

Dombivli Crime
Dombivli Crime | डोंबिवलीतील तरूणीच्या मृत्यूचा उलगडा: तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न, प्रियकराला बेड्या

गुंडांच्या टोळ्यांना हद्दपार करण्याची मागणी
    

कुंभारखाणपाडा भागात सुसाट टोळी, बैलगाडा टोळ्या, अशा विविध प्रकारच्या टोळ्या सक्रिय आहेत. पूर्ववैमनस्यातून या टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असते. रविवारी रात्री या वैमनस्यातून हा हाणामारीचा प्रकार घडल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे. जखमी व्यक्तीने पुन्हा हल्ला होण्याच्या भितीने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याचे समजते.

स्थानिक पोलिसांनी कुंभारखाणपाडा, गणेश नगर परिसरात गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कुंभारखाणपाड्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा आढावा घेऊन त्यांना या भागातून हद्दपारीच्या दृष्टीने कारवाया करण्याची मागणी भयभीत आणि त्रस्त रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news