District Fertilizer Sales Thane : ठाणे जिल्ह्यात खत विक्रीला डिजिटल बुस्टर ; शेतकऱ्यांना घरबसल्या बुकिंग

शेतकऱ्यांची खतासाठी धावपळ थांबणार : १५ ऑगस्टपासून घरबसल्या बुकिंग
Thane news
Thane news
Published on
Updated on

शुभम साळुंके

नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपासून रासायनिक खतांची बुकिंग घरबसल्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकरी स्वतःच्या अथवा कुटुंबातील सदस्याच्या मोबाईलवरून ‘FFS’ अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या गरजेनुसार पीकनिहाय रासायनिक खतांची आगाऊ बुकिंग करू शकणार आहेत. त्यामुळे खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर होणारी गर्दी आणि धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.

Thane news
Thane News : रस्ता, पाणी, वीज द्या; नाहीतर गावात प्रवेश बंद!

शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून झाडाच्या एका पानाचे चिन्ह असलेले ‘FFS’ अ‍ॅप डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर आधार ओटीपी अथवा ई - केवायसीच्या माध्यमातून ओळख पडताळणी करून आपला फार्मर आयडी अथवा अ‍ॅग्रिस्टॅकचा ११ अंकी क्रमांक नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर जवळचे कृषी सेवा केंद्र निवडून एका हंगामासाठी आवश्यक असलेल्या पीकनिहाय रासायनिक खतांची बुकिंग करता येणार आहे.

Thane news
Thane News : घनदाट जंगलात अडकलेल्या महिलेची तीन दिवसांनी सुटका

विशेष म्हणजे, ज्या कृषी सेवा केंद्राची निवड करून खताची बुकिंग करण्यात आली आहे, त्या केंद्रातून बुकिंगनंतर तीन दिवसांच्या आत खताची उचल करणे बंधनकारक राहणार आहे. बुकिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना क्यूआर कोड अथवा टोकन क्रमांक मिळणार असून, त्याच्या आधारे कृषी सेवा केंद्रातून खताचा पुरवठा केला जाणार आहे.

Thane news
Thane News: आरोग्य कर्मचारी घेणार गावोगावी संशयित रुग्णांचा शोध; लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणीचा सल्ला

या उपक्रमाबाबत ठाणे जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच कृषी सेवा केंद्र चालकांसाठी नुकतीच पंचायत समिती हॉल, कल्याण येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे. जिल्हा मोहीम अधिकारी बनकर, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी शिंदे तसेच सर्व तालुकास्तरीय गुणनियंत्रण अधिकारी उपस्थित होते.

Thane news
Thane News: उसाटनेत सराईत आरोपींची गुंडगिरी; वाहनांचा ताफा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

त्यांनी अ‍ॅपवरील बुकिंग प्रक्रिया, खत उपलब्धता आणि शेतकऱ्यांना द्यावयाच्या सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण आशिष बालगुडे यांचीही उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेत पीकनिहाय आवश्यक खतांची वेळेत बुकिंग करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news