Thane Dahi Handi: ठाण्यात थरावर थर... दहा थर! गोविंदांचा थरथराट पाहून महामुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला

साई राम, रामनगरचा राजा, शिवगणेश अन् खोपटचा राजा पथकांची दमदार कामगिरी
Thane Dahi Handi
Thane Dahi HandiPudhari
Published on
Updated on

ठाणे/मुंबई: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महामुंबई प्रदेश दहीहंडीच्या जल्लोषात न्हाऊन-माखून निघाला. गोविंदा पथकांनी पाच ते नऊ थर रचत दिवसभर थरांवर थर रचले आणि एकेक थर वाढत जाताना महामुंबईकरांच्या काळजाचे ठोके चुकले.

या थरांवर कळस चढला तो ठाण्यात. जोगेश्‍वरी-मुंबईच्या आर्यन गोविंदा पथकाने मनसेच्या दहीहंडी उत्सवात दहा थरांची सलामी देत गतवर्षीच्या विक्रमाला पुन्हा गवसणी घातली.

Thane Dahi Handi
Mumbai Dahi Handi Traffic Diversion: दहीहंडीच्या उत्सवावर पोलिसांची करडी नजर; वाहतुकीसाठी मार्गबदल, गर्दीसाठी विशेष बंदोबस्त

ठाण्यात सकाळपासूनच नऊ थरांची सलामी महत्वाच्या दहीहंडी पथकांनी दिली. शिवगणेश गोविंदा मंडळ, ठाणे, साईराम जोगेश्‍वरी, ओंकार गिरगाव, संकल्प अशा मंडळांनी नऊ थरांचा विक्रम कायम ठेवला.

नौपाड्यातील मनसेच्या दहीहंडीमध्ये साई राम गोविंदा पथकाने तब्बल नऊ थर यशस्वीरीत्या रचत दणदणीत कामगिरी केली. आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रामनगरचा राजा गोविंदा पथकाने सर्वप्रथम नऊ थरांची सलामी देत मोठ्या बक्षिसावर आपले नाव कोरले.

Thane Dahi Handi
All in One Teachers: राज्यात तब्बल अडीच लाख शिक्षक ‘ऑल इन वन’! एका शिक्षकाच्या खांद्यावर सर्व विषयांचे ओझे

प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मानाच्या दहीहंडीतही शिवगणेश गोविंदा पथकाने नऊ थरांचा थरार सादर केला. पथकाच्या या दमदार कामगिरीने दहीहंडीच्या ठिकाणी उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली.

तर ठाण्याच्या ऐतिहासिक टेंभी नाका येथील दिघे साहेबांच्या दहीहंडीत खोपटचा राजा गोविंदा पथकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नऊ थरांची सलामी देत मान पटकावला.

यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्य ठरले ते महिला गोविंदा पथकाचे सात थरांचे धाडस. ठाण्यात पहिल्यांदाच शिवतेज महिला गोविंदा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला. ठाण्यात आर्यन गोविंदा पथकाने 10 थर रचत विक्रमाची पुनरावृत्ती केली, तर अनेक पथकांनी 9 थरांची सलामी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news