

ठाणे : आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार करीत तिला गर्भवती करणाऱ्या ४५ वर्षीय नराधम बापाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. एस. देशमुख यांनी गुरुवारी दोषी ठरवीत २० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात मुलीने साक्ष फिरविली मात्र वैद्यकीय अहवालात पीडितेचा आणि नराधमाचा डीएनए जुळल्याने खटल्याला कलाटणी मिळाली. सदरचा प्रकार २०२१ मध्ये भाईंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. अशी माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी दिली.
पीडित आणि नराधम आरोपी हे नात्याने बाप लेक आहेत. आरोपीने कुकर्म करीत पोटच्या मुलीशी संबंध प्रस्थापित केल्यानंतर पीडितेला ठार मारण्याची धमकी दिली होती. मुलगी गर्मभवती झाल्यानंतर तिचे मूळ पाडून ते घराच्या मागे पुरण्यात आले होते. मुलीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. नराधम आरोपी याच्या विरोधात भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. सदर प्रकरण ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांच्या समोर आल्यावर सरकारी वकील हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे आणि १३ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून नराधम पित्याला दोषी ठरविण्यात आले. यावेळी सादर केलेल्या पुराव्यामध्ये डीएनए अहवाल हा महत्वाचा पुरावा ठरला. त्यानुसार त्या नराधम पित्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्ष भोगावी लागेल असेही न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांन काम पाहिले तर तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक विश्वास बाबर यांनी तपास केला. याशिवाय पैरवी अधिकार म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जाधव, कोट कारकून म्हणून सहायक फौजदार म्हणून संतोष गायकवाड, पोलिस अंमलदार सीमा युनूस पठाण तसेच समन्स वॉरंटचे काम हेडकॉन्स्टेबल दिपक गिरासे व पोलिस शिपाई परसराम कांदळकर यांन काम पाहिले.