

ठाणे : प्रवीण सोनावणे
ठाणे शहराची ओळख एकेकाळी तलावांचे शहर अशी होती. निसर्गख्य परिसर, विस्तारणान्या नागरी सुविधा आणि मुंबईच्या जवळ असूनही स्वतंत्र अस्तित्व जपणारे शहर म्हणून ठाण्याकडे पाहिले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ठाणेकरांच्या वाटयाला येणारे चित्र काही वेगळेच आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेली विविध विकासकामे, रस्त्यांची खोदकामे, मेट्रो प्रकल्प, घोडबंदर महामार्गावरील सेवा रस्त्यांचा समावेश करण्याचे काम आणि अन्य पायाभूत सुविधांचे प्रकल्प यामुळे ठाणे शहर अक्षरशः विकासकामांच्या विळख्यात सापडले आहे. परिणामी, तलावांचे शहर म्हणून ओळखले आणारे ठाणे आता वाहतूककोंडीचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
विकास हा कोणत्याही शहराच्या प्रगतीचा महत्त्वाचा आधार असतो, वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि नागरी सुविधांची गरज लक्षात घेता मोठे प्रकल्प राबविणे अपरिहार्य आहे, ठाणे शहरात मेट्रो, रस्ते रुंदीकरण, सेवा रस्ते, उड्डाणपूल आणि अन्य पावाभूत सुविधांची कामे सुरू असणे ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. मात्र, विकासकामे करताना त्याचे नियोजन, कामांचा कालावधी, वाहतुकीचे पर्यायी मार्ग, सुरक्षितता आणि पर्यावरणाचा विचार होणे तितकेच आवश्यक आहे. दुर्दैवाने, ठाण्यात याच नियोजनाचा मोठ्या प्रमाणात अभाव जाणवत आहे.
घोडबंदर मार्ग हा ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीसाठी या मार्गाचे महत्त्व मोठे आहे. या मार्गावर मेट्रोसह विविध प्रकल्पांची कामे सुरू असल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ अनेक पर्टीनी वाढत असून, कार्यालयीन वेळेत तर या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे नागरिकांसाठी मोठी परीक्षा ठरत आहे.
घोडबंदर पट्टचातील सेवा रस्त्यांचा महामार्गात समावेश करण्यासारखे प्रकल्पही महत्त्वाचे असले तरी त्यांची अंमलबजावणी करताना वाहतुकीचे व्यवस्थापन कसे करायचे, याचे ठोस नियोजन आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले दिसतात. एका बाजूला काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला वाहतुकीचा ताण वाढतो. परिणामी, वाहनांच्या लांबच लांच रांगा लागतात. या कोंडीत रुग्णवाहिका, शाळेच्या बस, सार्वजनिक वाहतूक आणि खासगी वाहनधारक सर्वच अडकून पडतात.
वाहतूक कोंडीचा हा प्रश्न आता एखाद्या विशिष्ट परिसरापुरता मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण शहराला त्याचा फटका बसत आहे. ठाण्यातील अनेक रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यांच्या कडेला खोदलेले खड्डे, उघडे ठेवलेले बांधकाम साहित्य, लोखंडी सळ्या आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
रात्रीच्या वेळी अपुरे प्रकाशमान, धोकादायक वळणे आणि योग्य दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. विकासकामे सुरू असताना नागरिकांच्या जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा ही संबंधित यंत्रणांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळले जात आहेत का, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
घर घेतले; पण जगायचे कसे ?
घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली. अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकणी गृहप्रकल्पांची कामे सुरु आहेत. मुंबईच्या तुलनेत परवडणारी घरे, चांगल्या नागरी सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या आशेने अनेकांनी आयुष्यभराची पुंजी खर्च करून येथे घरे घेतली. मात्र, आज त्याच रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ, अपूर्ण रस्ते आणि अनिश्चित प्रवास यांचा सामना करावा लागत आहे.