Thane child assault case: ठाण्यात बांधकामसाईटवर 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; परप्रांतीय आरोपीस अटक

2 दिवसापूर्वीच बिहारमधून आला होता कामाला
Thane child assault case
Thane child assault casePudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाण्याच्या नौपाडा परिसरात बांधकाम साईटवर मजुरीचे काम करणाऱ्या आणि तेथेच राहणाऱ्या मजुराच्या 7 वर्षीय मुलीवर याच साईटवर नुकतेच मजुरी करणाऱ्या बिहार राज्यातुन आलेल्या मजूर राम लड्डू मध्येश्वर यादव(45) याने अत्याचार करून पोबारा केला.

दरम्यान, नौपाडा पोलिसांनी तीन पथके तयार करून आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला न्यायालयात नेले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Thane child assault case
Dahisar Kashigaon Metro: दहिसर ते काशिगाव प्रवास आता 30 मिनिटांत; ठाण्यातील पहिल्या मेट्रोने मिरा-भाईंदरचा चेहरा बदलणार

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या बांधकाम साईटवर काम करणारा मजूर हा त्याच ठिकाणी तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या ठिकाणी पत्नी आणि दोन मुलींसह राहत होता.

काही दिवसापूर्वी पत्नी गावी गेल्याने सध्या घरात मजुरीचे काम करणारे वडील आणि 7 वर्षाची मुलगी होती. घरी सोमवारी रात्री मुलगी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी राम लड्डू मध्येश्वर यादव (45) याने चिमुरडीवर अत्याचार करून घटनास्थळावरून पळून गेला.

Thane child assault case
Panvel Uran land conflict: उरण-पनवेल पट्ट्यात एमएमआरडीए प्रकल्पांवरुन संघर्ष; भूसंपादनाचा मुद्दा ठरतोय कळीचा

सदर प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करताच पोलिसांनी त्वरित तीन पोलीस पथके तयार करून आरोपी यादव याला पळून जाण्यापूर्वीच अटक केली. पोलिसांनी त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. ठाणे न्यायालयात नेले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

नौपाडा पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी राम लड्डू मध्येश्वर यादव हा बिहार राज्यातून कामासाठी सदर बांधकाम साईटवर दोन दिवसापूर्वी आला होता. याच बांधकाम साईटवर त्याचा भाऊ अनेक दिवसांपासून मजुरीचे काम करीत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news