ठाणे, पुढारी वृत्तसेवा : स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. याचसोबत अभिनेता जॅकी बगनानी आणि अभिनेत्री राकुल प्रीत कौर यांचीही हजेरी लावली आहे. गोविंदा पथकांना उत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी आणखी जोरदारपणे उत्सव साजरे करण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हंडीला वरून राजाही प्रसन्न झाला आहे. मुंबईत तसेच ठाण्यात गोविंदाचा उत्साह शिगेला पोचला असून, खरं म्हणजे ठाणे हे गोविंदाचे पंढरी असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरु केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करू लागले. आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो , त्यामुळे आपण राज्यात चांगले काम करत आहोत.
अभिनेत्री राकुल प्रीत कौर म्हणाली, हा माझा पहिला दहीहंडी उत्सव आहे. मला आनंद आहे ठाण्यात येऊन हा उत्सव साजरा करायला मिळाला. अभिनेता जॅकी बगनानी यांनी मी अनेक हंडी बघितल्या पण हा उत्सव उत्सवातील उत्साह कधीच पहिला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा टेभी नाका मित्रमंडळाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला.