ठाणे : पोलीस वसाहतीत छताचे प्लास्टर कोसळले

पोलिसांच्या जीर्ण वसाहतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
ठाणे : पोलीस वसाहतीत छताचे प्लास्टर कोसळले

ठाणे : जनेतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचीच कुटुंबे जीव मुठीत धरून वास्तव्य करीत असल्याची बाब ठाण्यात समोर आली आहे. ठाण्यातील न्यू पोलीस लाईनमधील बिल्डिंग नंबर ६ मध्ये इमारतीच्या छताचा भाग गुरुवारी (दि.२७) रात्री कोसळला.

या घटनेत सुदैवाने घरातील मुलगा बचावला असून संभाव्य दुर्घटना टळली आहे. तरी येथे वास्तव्य करणारी कुटुंबे धास्तावली असून पुन्हा एकदा पोलिसांच्या जीर्ण वसाहतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस वसाहतीत्तील रहिवाश्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ टोलवाटोलवी सुरु असल्याचा आरोप केला.

ठाणे : पोलीस वसाहतीत छताचे प्लास्टर कोसळले
Thane News : ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला

ठाण्यातील सिव्हील रुग्णालयानजीक असलेली पोलिस लाइन अतिशय जुनी वसाहत असून या वसाहतीतील अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. गुरुवारी (दि.२७) रात्री सिद्धी हॉल येथील बिल्डिंग नंबर सहा मधील रूम नंबर ४ च्या सदनिकेच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. ही इमारत तळ अधिक चार मजली असून येथे अनेक पोलीस कुटुंबे वास्तव्य करतात. घरातील छताचा भाग अचानक कोसळल्याने इमारतीतील रहिवाश्यांमध्ये घबराट पसरली. ही वसाहत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news