Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्येच्या निषेधार्थ कँडल मार्चमध्ये सहभागी होण्यावरून वाद

मनोरमानगरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी,परस्पर विरोधी गुन्हे
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : ठाण्याच्या मानपाडा परिसरातील उबाठा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये सहभागी झाल्याच्या वादाचे रूपांतर दोन गटात तुफानी हाणामारीत झालेले असून यामध्ये तीनजण जखमी झाल्याची घटना समोर आलेली आहे. तर कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कापूरबावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या संताजी शिंदे यांनी आदिलेल्या तक्रारीत अमित पांडे आणि विश्वजीत झा यांनी जुन्या वादातून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच बर्फ फोडण्याच्या टोच्याने पोटावर आणि छातीखाली वार केल्याने ते जखमी झाले.

Pradeep Purnekar Case
Nashik Municipal Corporation Action | अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर महापालिकेचा दणका; पहिल्याच दिवशी 123 फलक जप्त

यापूर्वी विश्वजीत याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप त्यांनी तक्रारींद्वारे केलेला आहे. तर दुसरा गट अमित अमित पांडे याने दिलेल्या तक्रारीत अमित मित्र विश्वजीत झा यांच्यासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना संताजी उर्फ बाळा शिंदे आणि धनाजी शिंदे यांनी त्यांना ११ नोव्हेंबरच्या कँडल मार्चमध्ये सहभागी झाल्याबाबत जाब विचारला.

त्यानंतर संताजी यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर, तर धनाजी यांनी त्याच रॉडने पायांवर मारहाण केली. तसेच सिमेंट ब्लॉकने छाती व खांद्यावर मारल्याचा आरोप आहे. विश्वजीत यालाही मारहाण करून हात पिळल्याची घटना घडलेली होती हे तक्रारीत नमूद केलेले आहे. या दोन्ही गटांनी तुफानी हाणामारीत लोखंडी रॉड, बर्फ फोडण्याचा टोचा आणि सिमेंट ब्लॉकचा वापर; सर्रासपणे करण्यात आलेला होता.

Pradeep Purnekar Case
Daund Crime: दौंडमध्ये जुन्या वादातून ३१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना अटक

या प्रकरणी दोन्ही गटांतील जखमींनी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार घेतले असून, या परस्परविरोधी तक्रार दाखल असून कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.