Thane-Borivali Tunnel | ठाणे-बोरिवली बोगदा सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवा : उपमुख्यमंत्री शिंदे

MMRDA Tunnel Extension | एमएमआरडीएला निर्देश; प्रवाशांची होणार कोंडीतून सुटका
Thane Borivali Connectivity
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde(File Photo)
Published on
Updated on

Thane Borivali Connectivity

ठाणे : मुंबई - ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचे निर्देश उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली.

ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील 5 इमारतीमध्ये राहणार्‍या रहिवाशांनी विरोध केला होता. या कामामुळे वाढलेला धुळीचा त्रास व दररोज 300 ते 500 डंपरच्या वाहतुकीमुळे येथील रहिवाशांनी मुल्लाबाग येथील बोगद्याचे काम थांबवण्याची मागणी करत आंदोलन केले होते. रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली.

Thane Borivali Connectivity
Thane News | शहापुरातील 1,500 शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत

या बैठकीला ठाण्याचे खा. नरेश म्हस्के, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव व मुल्लाबाग रहिवाशी संघाचे सदस्य, गृहसंकुलाच्यावतीने युवासेनेचे नितीन लांडगे, राकेश मोदी, आशुतोष शिरोडकर, गौतम दिघे, पल्लवी शेट्ये, पंकज ताम्हाणे उपस्थित होते. बैठकीत मुल्लाबाग रहिवाशी संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेतल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी व वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Thane Borivali Connectivity
MMRDA वसाहतीतील पुर्नखरेदी केलेली घरे नावावर होणार!

या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनिएपेक्स कंपनीच्या आवारात डंपर व टिप्परमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित केले आहे.

पाहणी करण्याचे आश्वासन

यासोबतच युनिएपेक्स कंपनीच्या जागेतून डीपी रोड प्रस्तावित असून भविष्यात येथे वाढणार्‍या लोकवस्तीचा विचार करता ही जागा संपादित करून हा रस्ता देखील लवकरात लवकर करावा, तसेच या प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिकेला अधिग्रहित करायची असलेली युनिएपेक्स कंपनीची जागा देखील लवकरात लवकर अधिग्रहित करावी असेही निर्देश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news