Thane Bogus Doctors: ठाण्यात 24 बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; झोपडपट्ट्यांमध्ये थाटले होते दवाखाने

आरोग्य विभागाच्या पाहणीत 24 बोगस डॉक्टर
Doctors
DoctorsPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे महापालिका हद्दीतील बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. कसलीही अधिकृत वैद्यकीय पदवी तसेच परवाने नसणाऱ्या या 24 मुन्नाभाईची कबुली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. परराज्यातून आलेले हे बोगस डॉक्टर ठाणेकरांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाईच्या नावाने मात्र बोंब असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या बोगस डॉक्टरांनी घोडबंदरसह ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये आपले दवाखाने थाटले आहेत. ठाणे पालिकेच्या मागील महासभेत शहरातील बोगस डॉक्टरांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

Doctors
Eco Friendly Ganeshotsav: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जागा, शाडूमाती मोफत; पर्यावरण दिनानिमित्त पालिकेचा मास्टरप्लॅन

त्यामुळे नेमलेल्या पथकाकडून प्रभाग समिती निहाय कारवाई करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची संपूर्ण माहिती उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आरोग्य विभागाकडे मागितली. त्यानुसार 13 मार्च ते 18 मे या कालावधीत 24 संशयीत बोगस डॉक्टर असल्याची कबुली आरोग्य विभागाने दिली आहे.

Doctors
Maharashtra Loan Waiver: कर्जमाफीपेक्षा शेतकरी स्वामीनाथन आयोग शिफारसींच्या प्रतीक्षेत

नावे, पत्ते पालिकेने जाहीर करावे

ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण 1 हजार 767 खासगी दवाखाने आहेत. त्यातील 1 हजार 451 दवाखान्यांची तपासणी महापालिकेच्या विशेष पथकाकडून करण्यात आली असल्याचे पत्र पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील यांनी उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिले आहे. दरम्यान, या बोगस डॉक्टरांची नावे, त्यांचे पत्ते पालिकेने जाहीर करावे अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे.

घोडबंदरला सर्वाधिक बोगस डॉक्टर

दिवा सारख्या शहरात दररोज नवनवीन दवाखाने सुरू होत आहेत. अख्या दिव्यात 5 तर सर्वाधिक माजिवडा मानपाडा प्रभाग समिती हद्दीत 6 बोगस डॉक्टर आहेत. तर झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती हद्दीत एकही बोगस डॉक्टर नसल्याने पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रशचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

24 संशयित बोगस डॉक्टरांच्या संदर्भात ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून चौकशी सुरु आहे. लवकर या बोगस डॉक्टर संदर्भातील अहवाल तयार करण्यात येणार आहे.

- डॉ. प्रसाद पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे पालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news