

BMW vehicle suddenly catches fire at Kasarvadavali Naka
ठाणे : ठाणे येथील कासारवडवली नाका येथे बीएमडब्ल्यू वाहनाला अचानक आग लागली. या आगीत महागडे वाहन पूर्णपणे जळून गेली आहे. सुदैवाने वाहनचालक आणि त्यांची मुलगी बचावली असल्याचे वृत्त हाती आले आहे.
या वाहनाच्या मागे असणाऱ्या चारचाकी वाहनचालकाने प्रसंगावधान होत वाहनाला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आणून दिल्याने वेळीच मोठा संभाव्य धोका टाळता आला आहे. यावेळी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र तोपर्यंत ठाण्याच्या दिशेकडे जाणारी वाहतूक थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांची मोठी रांग गायमुख पर्यंत पोहचली आहे. वाहतूक पोलीसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.