Maharashtra Politics : ठाण्यात भाजपला शिंदेसेना नकोच; युती अमान्य

युती झाल्यास आमच्या भवितव्याचे काय, विचारला सवाल
Maharashtra politics
ठाण्यात भाजपला शिंदेसेना नकोच; युती अमान्यfile photo
Published on
Updated on

दिलीप शिंदे

ठाणे : ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बनविण्याची घोषणा करीत वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप देत युती करण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. भाजपच्या शंभर प्रभाग अध्यक्षांनी युती अमान्य असल्याचे सांगितले. शिवसेनेशी युती झाल्यास 131 पैकी सुमारे 100 प्रभागांत निवडणूक लढविण्याची संधी आम्हाला मिळणार नाही. पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येईल अशी भीती 18 ब्लॉक अध्यक्षांनी व्यक्त केली.

Maharashtra politics
Maharashtra Politics : नवी मुंबई, ठाण्यात सेना-भाजप युती धोक्यात?

शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ठाणे महापालिकेत भाजपचा एकही महापौर झालेला नाही. पालिकेत नेहमीच उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले आहे. पक्ष वाढीला फारशी संधी मिळालेली नाही. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून शिवसेनेशी युती करण्याचा इतिहास आहे.

2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला आणि त्याच्या नगरसेवकांची संख्या वाढून 23 झाली होती. त्यावेळी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिल्याचे दिसून आले होते. एवढेच नाही निवडणुकीनंतर महापालिकेत युती झाल्यावरही भाजपच्या नगरसेवकांना फारसे बळही दिले गेले नाही, अशी तक्रार नेहमीच भाजपच्या माजी नगरसेवकांकडून सातत्याने करण्यात आली होती. त्यामुळे पक्ष वाढ खुंटल्याचा दावा करण्यात आला होता. 2019 मध्ये राज्यात युती तुटली आणि भाजप विरोधी पक्षात बसल्यानंतर भाजपने ठाण्यात पक्ष वाढीकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली.

2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना - भाजपचे सरकार आले. त्या सरकारमध्ये गणेश नाईक हे वनमंत्री झाले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरत स्वबळाचा नारा दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशामुळे भाजपाने प्रत्येक प्रभागात इच्छुकांना कामाला लावले. कारण 68 नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेचे फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची संख्या 85 वर नेली आहे. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना शिवसेनेत घेतल्याने युती झाल्यास भाजपला फारसी संधीच उरणार नाही याची पूर्वकल्पना असल्याने स्थानिक नेते कामाला लागले होते. त्यात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी अगळी बार 100 पारच नारा दिल्याने भाजपला वाढण्याची संधी मिळणार नाही हे स्पष्ट झालेले आहे.

अशा वेळी शिवसेनेसोबत युती झाल्यास भाजपला 30 ते 40 च्या दरम्यान जागा मिळतील. कारण विद्यमान जागा ज्या पक्षांनी जिंकल्या आहेत, त्या जागा त्या पक्षाला सोडण्याचा फॉर्मुला राबविला जाणार असल्याने भाजपच्या वाट्याच्या 23 जागा निश्चित झाल्या आहेत. उर्वरित मिळणार्‍या 10 ते 15 जागा ह्या मुंब्रा सारख्या ताकद नसलेल्या प्रभागांमध्ये मिळणार असल्याने भाजपमध्ये नाराजी दिसून येते. 131 पैकी 30 ते 40 जागा मिळाल्या तर सुमारे 100 प्रभागात भाजपचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे भाजपच्या 18 मंडळ अध्यक्षांनी युतीविरोधात मोहिम उघडली आहे. त्याची अंतर्गत बैठकही झाली असून तशी भूमिका त्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मांडली आहे.

Maharashtra politics
Maharashtra politics : मुंबईत भाजपाला, ठाण्यात शिंदेंना झुकते माप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news