Thane Bhiwandi Metro 5: ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे श्रेय प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांचे: कपिल पाटील

ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गाची चाचणी झाल्यानंतर कपिल पाटील यांनी स्थानकांची पाहणी केली; प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा.
Mumbai Metro
Mumbai MetroPudhari
Published on: 
Updated on: 

संजय भोईर

भिवंडी: ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प -५ चे श्रेय हे फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. पण सर्वप्रथम मागणी केल्याचे श्रेय मी जरूर घेणार. न केलेला कामाचे क्रेडिट घेण्याची आपली सवय नाही, अशी परखड प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कुणाचे नाव न घेता दिली आहे.

ठाणे ते भिवंडी या सुमारे १२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम पूर्णत्वास आले असून मागील आठवड्यात या मार्गावर मेट्रो ट्रेनची चाचणी घेण्यात आली.

त्या पार्श्वभूमीवर या मेट्रोसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा व काल्हेर येथील मेट्रोस्थानकांना भेटी देऊन तेथील कामांचा आढावा घेतला.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मेट्रो प्रकल्पाच्या अधिकारी योजना पाटील व नगरसेवक सुमित पाटील, सभापती ॲड. वैभव भोईर, श्रीधर पाटील, छत्रपती पाटील, हरिश्चंद्र पाटील, विनोद मुकादम, सीताबाई पाटील, राजेंद्र भोईर, स्नेहा पाटील, प्रताप पाटील उपस्थित होते. यावेळी काल्हेर मेट्रो स्थानकात समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.

कपिल पाटील यांनी २०१८ मध्ये कल्याण येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्प ५ चे भूमिपूजन होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोसाठी तत्कालीन खासदार म्हणून मी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा मेट्रो प्रकल्प सुरू केला आहे, असे यावेळी सांगितले.

सतत पाठपुरावा केला

मेट्रो-५ प्रकल्पाचे मी सगळे श्रेय कधी घेणार नाही, पण या कामासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करत राहिलाे. प्रकल्प पाचसाठी सुरुवातीला केंद्र सरकार २० टक्के रक्कम देणार होते परंतु नंतर शासकीय प्रक्रियेमध्ये ते घेतले नाही, याचा अर्थ केंद्र सरकारचा प्रकल्प नाही, असे म्हणता येणार नाही, असे कपिल पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.