ठाणे : अमितने विधानसभा लढवावी; मात्र निर्णय राज ठाकरे यांचाच - Sharmila Thackeray

शर्मिला ठाकरे यांचे सूचक विधान; टेंभीनाका येथे घेतले देवीचे दर्शन
Sharmila Thackeray
Raj Thackeray's wife
Sharmila Thackeray Raj Thackeray's wifepudhari file photo
Published on
Updated on

ठाणे : अमित ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी ही माझीही इच्छा आहे, मात्र याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील, असे सूचक विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या सूचक विधानामुळे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

शर्मिला ठाकरे यांनी बुधवारी (दि.10) ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर तेव्हा प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मत व्यक्त केले.

एन्काऊंटर वारंवार घडले पाहिजे; गुन्ह्यांना माफी नाहीच

शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या, बलात्कार करणार्‍या व्यक्तींना कोणतीही जात पात धर्म पक्ष नसतो. तो बलात्कारीच असतो. त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. परभणीत एका चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी वरील वक्तव्य केले. बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरनंतर काही लोकांनी पोलिसांच्या विरोधात कल्लोळ केला होता. पण, तेव्हाही मी म्हटले होते की, असे एन्काऊंटर वारंवार घडले पाहिजे. जोपर्यंत दहशत बसत नाही तोपर्यंत असे गुन्हे घडत राहणार, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. या गुन्ह्यांना माफी ही नाहीच. यातील गुन्हेगारांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनीही अशा प्रकारणातील व्यक्तींना कोणताही शिक्का न लावता सक्षमपणे कारवाई करून तो गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

यावेळी पत्रकारांनी अमित ठाकरे हे निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत का, हा प्रश्न विचारला असता माझी तशी इच्छा आहे. पण, त्यावर राज ठाकरे हेच निर्णय घेतील, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news