

ठाणे : मंगळवारी (दि.6) रोजी रात्री वादळी वाऱ्यासह ठाण्यात सर्वत्र पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बुधवार (दि.7) रोजी सकाळपासून वातावरण ढगाळ दिसून येत होते. त्यानंतर ढगांनी दाटी करत सकाळी दहा वाजता मुसळधार पाऊस पडू लागला आहे. तर विजा कडाडत आहेत. संपूर्ण वातावरण ढगाळ झाले असून मुसळधार पाऊस पडू लागल्याने ठाणेकरांची धावपळ उडाली आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांचे हाल झाले आहेत. दुचाकीस्वार आडोसा घेऊन भिजण्यापासून वाचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने तेही भिजू लागले आहेत. पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली असून हातगाडी चालक आदींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.