

वसई विरार: मिरा रोड मध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि.2) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सागर अथनीकर (वय २३) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. ते मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत होते.
सागर अथनीकर हे आपल्या एका सहकाऱ्यासह मिरा रोड मधील अपना घर या संकुलात राहत होते. रविवारी (दि.6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरात कोणी नसताना सागर यांनी पंख्याला गळफास घेऊन जीवनप्रवास थांबवला आहे. घरगुती वादातून त्यांनी असे केल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.